फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरुसेलम: सध्या इस्त्रायलचे इराण, हमास आणि सीरियातील बंडखोरांशी संघर्ष सुरु आहे. दिवसेंदिवस वातावरण तणावपूर्ण होत चालले आहे. दरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधल्याचे समोर आले आहे. खुद्द नेतन्याहूंनीच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधित इशारा दिला आहे. नेतन्याहूंनी आपल्या सोशल मीडियावर प्लॅटफटॉर्मवरील संदेशात त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधल्याचे म्हटले आहे.
गाझातील ओलिसींच्या सुटकेवर चर्चा
नेतन्याहूंनी ट्रम्प यांच्याशी इराण आणि संयुक्त मित्र राष्ट्रांमधील कारवाईबद्दल चर्चा केल्याचे म्हटले आहे. तसेच गाझातील ओलीसांना सोडवण्याबाबत आणि हमास युद्धाबाबत देखील चर्चा करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर हल्ला केला होता.
या हल्ल्यात 1200 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमवला आणि 250 हून अधिक लोकांना बंधक बणवण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रायलने देखील हल्ले केले. या हल्ल्यांमुळे 45,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. नेतन्याहूंनी इस्त्रालच्या उर्वरित बंधकांना घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
אמרתי שנשנה את המזרח התיכון וזה מה שקורה.
סוריה היא לא אותה סוריה.
לבנון היא לא אותה לבנון.
עזה היא לא אותה עזה.
איראן היא לא אותה איראן. pic.twitter.com/IFVso1czkH
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) December 15, 2024
सीरियावरील हल्ल्यांची इस्त्रायलीची भूमिका
तसेच इस्त्रायलच्या सीरियावरील हल्ल्याबाबतही नेतन्याहूंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, सीरियातील इराणी प्रभाव आणि हिजबुल्लाहला मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले. नेतन्याहूंनी असेही सांगितले की, त्यांच्या या धोरणांमुळे मध्य पूर्वेतील अनेक देश आणि परिस्थिती बदलली आहे. मात्र, ट्रम्प आणि नेतन्याहूंच्या संवादामुळे मध्य पूर्वेत संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याते म्हटले जात आहे.
ट्रम्प कार्यकाळात ओलिसींच्या सुटकेचा मोठा प्रश्न
सध्या गाझात परिस्थिती गंभीर असून, अनेक भाग खंडहर बनलेले आहे. गाझातील अनेक ओलिसींना अजूनही बंधक बणवण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळातमध्ये ओलिसींची सुटका महत्त्वाची समस्या आहे. यावर कोणता मार्ग ट्रम्प काढतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, ट्रम्प सध्या ओलिसींच्या सुटकेसाठी आग्रह धरुन आहेत. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यपदाची सुत्रे हातात घेताच ही समस्या सोडवण्यावर भर देण्यात येईल.
याच पार्श्वभूमीवर, इस्रायल-इराण यांच्यातील तणाव वाढत असून अमेरिका-इस्रायल युतीमुळे इराणविरोधात मोठ्या युद्धाच्या शक्यतेची चर्चा सुरू आहे. नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यातील चर्चा भविष्यातील राजकीय आणि लष्करी परिस्थितीला मोठ्या प्रमाणात प्रभावित करू शकते.