Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी; फ्लोरिडात एका संशयिताला पोलिसांकडून अटक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच अनेक कठोर निर्णय घेतले. सध्या त्यांच्या निर्णयामुळे ते जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनत आहे. याचदरम्यान त्यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी दिली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 27, 2025 | 11:02 AM
Suspect arrested in Florida for threatening to kill Donald Trump on social media

Suspect arrested in Florida for threatening to kill Donald Trump on social media

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच अनेक कठोर निर्णय घेतले. सध्या त्यांच्या निर्णयामुळे ते जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनत आहे. याचदरम्यान त्यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली होती. यासंबंधित पोस्ट करणाऱ्या फ्लोरिडामधील एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ही अटक FBIकडून मिळालेल्या माहितीनंतर करण्यात आली असून 46 वर्षीय एटकिंसने सोशल मीडियावर धमकीचे अनेक पोस्ट केले होते, यामध्ये ट्रम्प यांना थेट लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे ट्रम्प यांनी धमकवण्याच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या शॅनन एटकिंस नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Crisis: मोहम्मद युनूस सरकारवर संकटाचे सावट; अमेरिकेने काढून घेतली ‘ही’ मोठी मदत

सोशल मीडियावरील पोस्ट

इंग्रजी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ट्रम्प यांच्या शपथविधीच्या एक दिवस आधी शॅनन एटकिंसने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, “अमेरिकेला वाचवण्यासाठी फक्त एक गोळी पुरेशी आहे.” या पोस्टच्या आधारे शॅनन ला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शॅननला फ्लोरिडातील पाम बीचच्याजवळ शुक्रवारी अटक करण्यात आली. अटकेवेळी शॅननकडे सापडलेले कोकेन ड्रग्ज देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

FBI आणि सीक्रेट सर्व्हिस अलर्टमोडवर

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न करण्यात आला होता. निवडणुक प्रचारदारम्यान त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. यामुळे सध्या FBI आणि सीक्रेट सर्व्हिस हाय अर्लटमोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या सुरक्षिततेला मोठे महत्त्व दिले जात आहे. अशा परिस्थितीत शॅनन एटकिंसच्या सोशल मीडिया पोस्टने सुरक्षा यंत्रणांना आणखी दक्ष बनवले आहे.

एटकिंसची प्रतिक्रिया आणि पोलिसांचे विधान

या पोस्टविरोधात शॅनन एटकिंसने दावा केला आहे की, त्याने केलेली ही पोस्ट केवळ विनोद म्हणून लिहिण्यात आली आहे. मात्र, वेस्ट पाम बीचचे पोलिस प्रमुख टोनी अराउजो यांनी स्पष्ट केले की, “आजच्या काळात अशा प्रकारचे विनोद धोकादायक ठरू शकतात. हे कोणत्याही परिस्थितीत गंभीर आहे.”

पोलिसांनी त्याचे अन्य पोस्टही उघड केले असून त्यात त्याने लिहिले होते की, “इतिहास पुन्हा घडतोय. इथे वर्षानुवर्षे हत्या झालेली नाही.” सध्या शॅनन एटकिंसवर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप असून डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुसऱ्या डिग्रीची गुन्हा श्रेणी आहे. पुढे, सीक्रेट सर्व्हिस निर्णय घेणार आहे की त्याच्यावर संघीय आरोप लावायचे की नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घटनेतून हे सिद्ध होते की, सोशल मीडियावरील धमकीच्या पोस्ट्स गांभीर्याने घेतल्या जातात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी FBI आणि सीक्रेट सर्व्हिस अत्यंत सावध आहेत. अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई केली जात असून, पुढील कायदेशीर पावले लवकरच उचलले जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- टिकटॉक खरेदीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी केली अनेकांशी चर्चा; 30 दिवसांत घेणार निर्णय

Web Title: Suspect arrested in florida for threatening to kill donald trump on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या
1

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली
2

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई
3

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा
4

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.