
Taliban Deputy Prime Minister Mullah Baradar calls Pakistan a cowardly enemy and warns of retaliation
Taliban Deputy Prime Minister statement : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) सीमेवर पुन्हा एकदा तणावाचे ढग गडद होत आहेत. तालिबानचे उपपंतप्रधान तसेच संघटनेचे सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी पाकिस्तानवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला असून इस्लामाबादला “भित्रा शत्रू” ठरवत अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेत हस्तक्षेप करू नये, अशा शब्दांत थेट इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून अफगाण भूमीवर टीटीपी अर्थात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. या कारवायांमुळे निष्पाप नागरिक, महिला आणि मुलांचे बळी जात असून हे जागतिक तत्त्वांचे उल्लंघन आहे, असा आक्षेप बरादर यांनी घेतला आहे.
मुल्ला बरादर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अफगाणिस्तान कोणत्याही देशाशी संघर्ष इच्छित नाही, मात्र आपल्या सार्वभौमत्वावर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला तर तालिबान शांत बसणार नाही. “आमची स्मरणशक्ती तीव्र आहे आणि आम्ही स्वतःचे हिशेब चुकते करायला विसरत नाही,” या वाक्यातून त्यांनी पाकिस्तानला खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालिबान आता अत्याधुनिक शस्त्रसज्जतेकडेही वळत असल्याची माहिती समोर येत असून भविष्यात संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हिमालयाचे अस्तित्व अन् भारताचा विनाश’, ‘हे’ एकच कारण ठरणार प्रचंड विध्वंसक; BISच्या भूकंप नकाशामुळे 75% लोकसंख्या धोक्यात
गेल्या काही काळात पाकिस्तानने अफगाण सीमाभागात हवाई तसेच जमिनीवरून कारवाई केल्याचे वृत्त समोर आले होते. या कारवायांचा उद्देश टीटीपीच्या तळांना उद्ध्वस्त करणे असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. मात्र तालिबानच्या मते, या हल्ल्यांत सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अफगाण समाजात पाकिस्तानविरोधी भावना भडक होत असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही बाजूंनी परस्पर आरोप-प्रत्यारोप सुरूच असून राजनैतिक संवादही जवळपास ठप्प झाला आहे.
M.Baradar warning⚠️ to #Pakistan🇵🇰
Mullah Baradar told #Pakistan🇵🇰, Do not violate our airspace. Whatever you sow, you will reap.
He told Pakistan to respect neighborly principles and international law.
He added that if #Pakistan does not comply, the consequences will not be good https://t.co/b9AMhViJ0O pic.twitter.com/mVqzM5VvlU — ملا محمد یعقوب مجاهد (@Abdale313) November 30, 2025
credit : social media and Twitter
या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेला मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबान चळवळीचा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली चेहरा आहे. १९९४ साली मुल्ला उमरसोबत त्याने तालिबानची सह-स्थापना केली. तो मुल्ला उमरचा अत्यंत विश्वासू सहकारी मानला जातो. काही माहितीनुसार त्याने उमरच्या बहिणीशी विवाहही केला होता. १९८० च्या दशकात सोव्हिएत संघाविरोधात अफगाण मुजाहिदीनसोबत लढताना त्याने युद्धाचा मोठा अनुभव मिळवला. सोव्हिएत माघारीनंतर देशात निर्माण झालेल्या गृहयुद्धाच्या काळात त्याने आणि उमरने कंधारमध्ये मदरसा सुरू केला आणि तेथूनच तालिबान चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीच्या मानवरहीत ‘Bayraktar KIZILELMA’ फायटर जेटने केली अविश्वसनीय कामगिरी; ‘हा’ VIRAL VIDEO पाहून समजेल नक्की काय घडलं?
२०१० मध्ये पाकिस्तानातील कराची येथे त्याला अटक करण्यात आली होती. मात्र २०१८ मध्ये त्याची सुटका झाली आणि त्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला. आज तो तालिबान सरकारमधील एक वरिष्ठ पदाधिकारी असून लष्करी आणि राजकीय दोन्ही पातळीवर मोठा प्रभाव राखतो. पश्चिम अफगाणिस्तान, काबूल परिसर आणि विविध आघाड्यांवर त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचा जन्म १९६८ मध्ये उरुझगान प्रांतातील देहरावूड जिल्ह्यातील विटमक गावात झाला असून तो दुर्रानी जमातीच्या पोपलझाई शाखेचा आहे, हीच जमात माजी अफगाण राष्ट्रपती हमीद करझाई यांचीही आहे. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाढता तणाव केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण दक्षिण आशियाच्या सुरक्षेवर आणि राजकारणावर दिसू शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचेही लक्ष आता या भागाकडे केंद्रित झाले आहे.
Ans: तालिबानचा सह-संस्थापक आणि सध्याचा उपपंतप्रधान.
Ans: टीटीपी आणि सीमावर्ती हल्ल्यांमुळे.
Ans: तज्ज्ञांच्या मते शक्यता नाकारता येत नाही.