तुर्कीने इतिहास रचला जेव्हा त्यांच्या मानवरहित लढाऊ विमान किझिल्येल्माने, क्षेपणास्त्र वापरून हवेतच पाडले विमान. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
तुर्कीच्या सिनोप किनाऱ्याजवळ पार पडलेल्या या चाचणीत किझिलेल्माने आपल्या स्वदेशी AESA (Active Electronically Scanned Array) रडार आणि ‘मुराद’ फायर-कंट्रोल रडारच्या साहाय्याने लक्ष्य ओळखले. त्यानंतर ‘गोकडोगन’ या दृश्यमान पल्ल्याच्या (Beyond Visual Range) एअर-टू-एअर क्षेपणास्त्राचा वापर करून हवेत असलेले लक्ष्य नष्ट करण्यात आले. सीएनएनसह आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार, क्षेपणास्त्राने थेट लक्ष्यावर आदळत ते पूर्णपणे निष्क्रिय केले. तुर्की सरकार आणि बायकर कंपनीकडून या यशस्वी चाचणीचा अधिकृत व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘नाते तुटणार नाही’, पण प्रश्न राहतोच…’ Sheikh Hasina यांच्या प्रत्यार्पणाबाबत Bangladeshची कठोर भूमिका; पण भारत सरकार मौन
विश्लेषकांच्या मते, पारंपरिक लढाऊ विमानांच्या तुलनेत किझिलेल्मा हा ड्रोन खूप कमी रडार सिग्नल निर्माण करतो, त्यामुळे शत्रूच्या रडारपासून लपून राहण्याची त्याची क्षमता अधिक आहे. लाँग-रेंज सेन्सर्समुळे तो दूरवरूनच शत्रूची विमाने, ड्रोन किंवा लक्ष्य ओळखू शकतो. यामुळे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर अशा दोन्ही प्रकारचे हल्ले करण्याची क्षमता या मानवरहित लढाऊ विमानाला प्राप्त झाली आहे. भविष्यात मानवी वैमानिकांचा धोका टाळून स्वयंचलित युद्धाभ्यास करण्यासाठी ही प्रणाली महत्वाची ठरू शकते.
किझिलेल्मा हा प्रकल्प तुर्कीच्या ‘बायकर’ कंपनीने विकसित केला असून या कंपनीचे सीईओ हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांचे जावई आहेत, ही बाबही आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या काही वर्षांत बायकरने आपल्या TB-2 आणि अकिन्सी (Akinci) ड्रोनद्वारे युक्रेन, अझरबैजान आणि इतर संघर्षग्रस्त भागांमध्ये प्रभावी कामगिरी दाखवली आहे. केवळ २०२३ आणि २०२४ या काळात ड्रोन विक्रीतून कंपनीला अंदाजे अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले जाते, ज्यापैकी सुमारे ९० टक्के उत्पन्न निर्यातीमधून येते. सलग चार वर्षे ही कंपनी तुर्कीतील सर्वोच्च संरक्षण व एरोस्पेस उद्योगांपैकी एक ठरली आहे.
BREAKING — First in aviation history: Turkey’s unmanned fighter jet Kizilelma successfully hit another aircraft by using an air-to-air missile in the coast of Sinop The jet successfully destroyed a jet-engine–powered aerial target using a BVR (Beyond Visual Range) air-to-air… pic.twitter.com/h7E8od4DsD — Ragıp Soylu (@ragipsoylu) November 30, 2025
credit : social media and Twitter
या यशाचा भू-राजकीय परिणामही चर्चेत आहे. तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात ड्रोन पुरवले असून भविष्यात किझिलेल्माही तेथे तैनात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे दक्षिण आशियातील सामरिक समतोलावर परिणाम होऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. टीबी-२ आणि अकिन्सी यांसारख्या ड्रोनने आधीच विविध युद्धक्षेत्रांत प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे तुर्कीच्या या नव्या तंत्रज्ञानाकडे भारतासह अनेक देश बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Muskलाही भारतीय वंशाचा सार्थ अभिमान; जाणून घ्या का मुलाचे नाव ठेवले शेखर आणि बायकोला संबोधले Half-Indian?
चाचणीच्या दिवशी मर्झिफॉन एअर बेसवरून एफ-१६ लढाऊ विमानांनीही उड्डाण केले होते, ज्यामुळे हा संपूर्ण प्रयोग उच्च सुरक्षा आणि समन्वयाखाली पार पडल्याचे स्पष्ट होते. किझिलेल्मा हे एकाच टर्बोफॅन इंजिनवर चालणारे मानवरहित विमान असून त्याचे कमाल टेकऑफ वजन सुमारे ६,००० किलो आहे आणि ते जवळपास १,५०० किलो शस्त्रसाठा वाहून नेऊ शकते. हे विमान भविष्यात तुर्कीच्या TCG अनाडोलू युद्धनौकेवरूनही तैनात केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. एकूणच, किझिलेल्माच्या यशस्वी हवाई क्षेपणास्त्र चाचणीने मानवरहित युद्धतंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली असून जागतिक संरक्षण क्षेत्रात तुर्कीला एक महत्त्वाचा आणि प्रभावी खेळाडू म्हणून अधिक मजबूत स्थान मिळाले आहे.
Ans: कारण त्याने मानवरहित असूनही हवेतून हवेत क्षेपणास्त्र हल्ला करून लक्ष्य पाडण्याची क्षमता प्रथमच यशस्वीपणे दाखवली आहे.
Ans: यामुळे भविष्यातील युद्धांमध्ये मानवी वैमानिकांऐवजी मानवरहित प्रणालींचा वापर वाढण्याची शक्यता आहे आणि ड्रोन युद्धाचे महत्त्व अनेक पटींनी वाढेल.
Ans: कारण तुर्कीचे ड्रोन पाकिस्तानसारख्या देशांपरर्यंत पोहोचत असल्याने दक्षिण आशियातील सुरक्षा समीकरणांवर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.






