
taliban drone attacks pakistan military bases abbottabad video viral ttp clash
Pakistan Afghanistan open war news 2026 : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद (Pakistan Afghanistan open war) आता एका विद्ध्वंसक वळणावर पोहोचला आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या या संघर्षात अफगाण तालिबानने पाकिस्तानच्या लष्करी ताकदीला थेट आव्हान दिले आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रथमच पाकिस्तानच्या अंतर्गत भागात घुसून लष्करी तळांवर ड्रोन हल्ले (Drone Attacks) केल्याचा दावा केला असून, त्याचे थरारक व्हिडिओ आणि उपग्रह फुटेज (Satellite Imagery) जारी केले आहेत. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र समोर येत असून, दक्षिण आशियात महायुद्धाचा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत.
शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास झालेल्या या ड्रोन हल्ल्यांनी पाकिस्तानला हादरवून सोडले आहे. अफगाण हवाई दलाने (AAF) पाठवलेल्या ड्रोननी थेट इस्लामाबादजवळील फैजाबाद लष्करी छावणी, नौशेरा येथील लष्करी मुख्यालय, जमरुद येथील लष्करी टाउनशिप आणि विशेषतः अबोटाबादमधील लष्करी संकुलाला लक्ष्य केले. तालिबानने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी तळांवरून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा निघताना स्पष्ट दिसत आहेत. तालिबानच्या मते, हे हल्ले पाकिस्तानने काबूल आणि कंधारवर केलेल्या ‘ऑपरेशन राईटियस फ्युरी’चा बदला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार
एकीकडे सीमेवर तालिबानशी युद्ध सुरू असताना, पाकिस्तानला आपल्याच भूमीवर ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) कडून मोठा दणका बसला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात टीटीपीच्या फायटर्सनी पाकिस्तानी लष्करी ताफ्यावर अचानक हल्ला चढवला. सुरुवातीच्या माहितीनुसार, या भीषण चकमकीत सुमारे ४० पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. टीटीपीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे शस्त्रागारही लुटल्याचे वृत्त आहे. यामुळे पाकिस्तानची अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर कोंडी झाली आहे.
VIDEO | Afghanistan’s Taliban-led Defence Ministry releases footage of strikes on Pakistani targets. (Source: Third Party) pic.twitter.com/alqC13PuYD — Press Trust of India (@PTI_News) February 27, 2026
credit – social media and Twitter
तालिबानच्या वाढत्या आक्रमकतेनंतर पाकिस्तानने आता अधिकृतपणे “खुले युद्ध” (Open War) घोषित केले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ‘ऑपरेशन राईटियस फ्युरी’ (Operation Righteous Fury) अंतर्गत अफगाणिस्तानच्या २२ लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या हवाई हल्ल्यांत २७४ तालिबानी अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र, तालिबानने हा आकडा फेटाळून लावत पाकिस्तान केवळ नागरी भागांवर बॉम्बफेक करत असल्याचे म्हटले आहे. या युद्धामुळे ड्युरंड रेषेवरील सर्व व्यापारी मार्ग बंद झाले असून हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bolivia Plane Crash: आकाशातून पडला नोटांचा पाऊस; बोलिव्हियात लष्करी विमान कोसळले अन् महामार्गावर कोट्यवधी रुपये, पाहा VIDEO
तालिबानने असा दावा केला आहे की, ड्रोन हल्ल्यांव्यतिरिक्त जमिनीवरील लढाईत त्यांनी ५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे आणि अनेक सीमा चौक्यांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. पाकिस्तानने अबोटाबादमधील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याबाबत अद्याप मौन बाळगले आहे, परंतु उपग्रह छायाचित्रांनुसार तिथल्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. संयुक्त राष्ट्रांनी आणि शेजारील देशांनी हा संघर्ष त्वरित थांबवण्याचे आवाहन केले असले तरी, दोन्ही बाजू माघार घेण्यास तयार नाहीत.
Ans: तालिबानने अबोटाबाद, नौशेरा, फैजाबाद आणि जमरुद येथील लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला असून त्याचे पुरावे म्हणून व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत.
Ans: टीटीपीने खैबर पख्तूनख्वामधील बाजौर जिल्ह्यात पाकिस्तानी लष्करावर अचानक हल्ला केला, ज्यात सुमारे ४० सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
Ans: हे पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेचे नाव असून, याद्वारे त्यांनी २२ अफगाण तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.