Amir Khan Muttaqi on Pakistan (Photo Credit- X)
Amir Khan Muttaqi Conference: अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांचा अभाव असल्याने विरोधी पक्षांकडून तीव्र टीका होत आहे. यावर मुत्ताकी यांनी स्पष्टीकरण दिले की, कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही, तर केवळ मर्यादित संख्येने पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकार नसण्यामागे तांत्रिक कारणे आणि वेळेची मर्यादा होती. अफगाणिस्तानातील महिला आणि मुली शिक्षण घेत आहेत आणि शिक्षणाला आमचा विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत बोलताना मुत्ताकी म्हणाले की, त्यांना पाकिस्तानी जनतेबद्दल कोणतेही वैर नाही, मात्र काही घटक सतत समस्या निर्माण करत आहेत. “पाकिस्तानी नागरिक आमच्यावर हल्ले करतात आणि कारवाया सुरू करतात. मात्र कतार आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने आम्ही हा तणाव थांबवला,” असे त्यांनी सांगितले.
#WATCH | Delhi | On the tensions between Pakistan and Afghanistan, Afghanistan Foreign Minister Amir Khan Muttaqi says, “… The people of Pakistan, in the majority, are peace-loving and want good relations with Afghanistan. We have no issues with the Pakistani civilians. There… pic.twitter.com/knw7pYOFSx — ANI (@ANI) October 12, 2025
Pakistan-Afganistan Tension: पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव वाढला; स्पिन बोलदाक-चमन क्रॉसिंग बंद
मुत्ताकी पुढे म्हणाले, “बहुसंख्य पाकिस्तानी शांतताप्रिय आहेत आणि अफगाणिस्तानशी चांगले संबंध ठेवू इच्छितात. पण काही गट तणाव निर्माण करतात. आमचे सरकार आणि लष्कर आपल्या सीमा आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण करेल. काल रात्री आम्ही आमचे लष्करी उद्दिष्ट साध्य केले असून, आमचे मित्र कतार आणि सौदी अरेबिया यांनीही या संघर्षाचा अंत व्हावा असे म्हटले आहे. त्यामुळे परिस्थिती आता नियंत्रणात आहे.”
मुत्ताकी म्हणाले, “जेव्हा आमच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अफगाणिस्तानातील नागरिक, धार्मिक नेते आणि सरकार सर्व एकत्र येतात. देशाने गेल्या ४० वर्षांत संघर्षाचा सामना केला आहे, आणि आता तो शांततेच्या दिशेने वाटचाल करत आहे. जर पाकिस्तानला चांगले संबंध हवे नसतील, तर अफगाणिस्तानकडे इतर पर्याय आहेत.”
महिला शिक्षणावरील कथित बंदीबाबत त्यांनी सांगितले की, “अफगाण उलेमांचे संबंध मदरशांशी आणि देवबंद परंपरेशी घट्ट आहेत. सध्या आमच्या देशात १ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यापैकी २८ लाख महिला आणि मुली आहेत. धार्मिक मदरसे पदवीधर पातळीपर्यंत शिक्षण देतात. काही ठिकाणी मर्यादा आहेत, पण याचा अर्थ शिक्षणाला विरोध नाही. आम्ही शिक्षणाला ‘हराम’ घोषित केलेले नाही, फक्त तात्पुरते निलंबित केले आहे,” असे मुत्ताकी यांनी स्पष्ट केले.