अफगाणिस्तानच्या एअर स्ट्राईकने ५८ पाक सैनिक ठार (Photo Credit- X)
Afghanistan Attacked Pakistan: दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याला अफगाणिस्तानच्या सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मागील रात्री डुरंड लाइनवर (Durand Line) असलेल्या कुराम जिल्ह्यातील गावी क्षेत्रात पाकिस्तान आणि अफगाण सीमा दलांमध्ये भीषण संघर्ष झाला. खैबर पख्तुनख्वा (Khyber Pakhtunkhwa) आणि बलुचिस्तान (Balochistan) येथील सीमेवर झालेल्या गोळीबार आणि संघर्षात पाकिस्तानचे ५८ सैनिक मारले गेले. या जोरदार प्रत्युत्तरादरम्यान अफगाण सैन्याने सीमेवरील पाकिस्तानच्या २५ चौक्यांवर कब्जा केल्याचे वृत्त आहे.
सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानने खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमा बंद केल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत कठोर प्रत्युत्तर देण्याचा संकल्प केला आहे. दुसरीकडे, तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर पुन्हा अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न झाला, तर अफगाणिस्तानचे सशस्त्र दल कठोर प्रतिक्रिया देण्यास पूर्णपणे तयार आहेत.
#𝐁𝐑𝐄𝐀𝐊𝐈𝐍𝐆: 🚨Afghanistan has initiated an offensive against Pakistan from seven distinct border points, according to the Afghan Ministry of Defence; Huge battles underway. Pakistani jets have gone airborne in the east of the country.#Afghanistan #Pakistan pic.twitter.com/n5gwjaicYs — Jahangir (@jahangir_sid) October 11, 2025
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी काबुलमध्ये पत्रकार परिषदेत पाकिस्तानवर गंभीर आरोप केले. “पाकिस्तान आपल्या भूमीवर ISIS ला आश्रय देत आहे, पण अफगाणिस्तान असे करणार नाही.” “आम्हाला आमच्या हवाई आणि भूभागीय सीमांचे रक्षण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.” “पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे आणि त्यांना अफगाण सरकारकडे सोपवावे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी केंद्रे आजही कार्यरत आहेत.”
९-१० ऑक्टोबरच्या रात्री पाकिस्तानच्या सैन्याने TTP प्रमुख नूर वली मेहसूद यांना लक्ष्य करत अफगाणिस्तानमधील काबुल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका येथे हवाई हल्ले केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या २०१ खालिद बिन वालिद आर्मी कोरने पाकिस्तानच्या फ्रंटियर कोर्प्सच्या (Frontier Corps) तळांवर कुराम, बाजौर आणि नॉर्थ वजीरिस्तानमध्ये एकाच वेळी तोफ, मोर्टार आणि ड्रोन हल्ले केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा दोन्ही देशांमधील तणावावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या अंगूर अड्डा, बाजौर, कुर्रम, दीर, चित्राल आणि बलुचिस्तानमधील बारामचा येथील चौक्यांवर गोळीबार करून त्या उद्ध्वस्त केल्या आणि कब्जा केला.तालिबानच्या अधिकाऱ्यांनीही या संघर्षाला दुजोरा दिला आहे. माहितीनुसार, अफगाण सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांची शस्त्रे हिसकावून घेऊन हल्ला केला.