Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL

Bangladesh Violence: बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक खळबळजनक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांनी अनेक हिंदूंची घरे जाळली आहेत. 7 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळण्यात आले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 24, 2025 | 11:14 AM
Taslima Nasreen's sensational revelation Shocking video of Hindu houses being set on fire goes viral

Taslima Nasreen's sensational revelation Shocking video of Hindu houses being set on fire goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • लक्ष्मीपूरमध्ये घराला बाहेरून कुलूप लावून जिवंत जाळण्यात आलेल्या हिंदू कुटुंबातील ७ वर्षांच्या निष्पाप मुलीचा होरपळून मृत्यू झाला.
  • प्रख्यात लेखिका तस्लिमा नसरीन यांनी चितगावमधील हिंदू वस्त्या पेटवून दिल्याचे खळबळजनक व्हिडिओ ट्विट करत जगाचे लक्ष वेधले आहे.
  •  ईशनिंदेचा खोटा आरोप लावून दीपू चंद्रा या हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली, तपासात धार्मिक पोस्टचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.

Bangladesh Hindu homes burned December 2025 : शेजारील देश बांगलादेशात (Bangladesh) मानवता पुन्हा एकदा रसातळाला गेल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदू अल्पसंख्याकांविरुद्ध सुरू असलेला हिंसाचार आता पराकोटीला पोहोचला आहे. प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या घरांना आग लावून संपूर्ण वस्त्या राख केल्याचे दिसत आहे. या आगीत केवळ घरेच नाही, तर निष्पाप हिंदूंचे प्राणही होरपळून निघत आहेत.

लक्ष्मीपूरमध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीचा जिवंत अंत

हिंसेचा सर्वात भयानक चेहरा १९ डिसेंबरच्या रात्री लक्ष्मीपूर सदर भागात पाहायला मिळाला. रात्रीच्या गडद अंधारात, जेव्हा एक हिंदू कुटुंब शांतपणे झोपले होते, तेव्हा काही नराधमांनी त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावले. घराबाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद केल्यानंतर त्यावर पेट्रोल ओतून घर पेटवून देण्यात आले. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या ७ वर्षांच्या निष्पाप मुलीचा जागीच मृत्यू झाला. घरातील इतर तीन सदस्य गंभीररित्या भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. “पहाटे १ वाजता जेव्हा मदतीसाठी ओरडण्याचे आवाज आले, तेव्हा उशीर झाला होता,” अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : LVM3-M6 : मोफत इंटरनेटच्या दिशेने ISROचे लक्षणीय पाऊल; ‘Bluebird-2 Satellite’ मुळे होणार स्मार्टफोन क्रांती, वाचा कसे?

दीपू चंद्राची हत्या: ईशनिंदेचा खोटा बनाव

दुसरीकडे, १८ डिसेंबर रोजी ढाकाजवळील भालुका येथे दीपू चंद्रा या हिंदू तरुणाचा बळी घेण्यात आला. दीपू एका कापड कारखान्यात काम करत होता. कट्टरपंथीयांनी त्याच्यावर फेसबुकवर ‘ईशनिंदा’ केल्याचा आरोप लावला आणि त्याला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, प्राथमिक तपासात दीपूने अशी कोणतीही धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केल्याचे पुरावे आढळले नाहीत. कारखान्यातील अंतर्गत कामाच्या वादातून त्याला लक्ष्य करण्यासाठी ‘धर्माचा’ ढाल म्हणून वापर करण्यात आला आणि त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

Atrocities against Hindus continue in Bangladesh : In Chittagong, Muslims locked the doors of houses belonging to Hindus from outside, poured petrol, and set them on fire.. Are they even humans? pic.twitter.com/bUo3hHzWVS — Mr Sinha (@MrSinha_) December 24, 2025

credit : social media and Twitter

प्रशासनाचे मौन आणि तस्लिमा नसरीन यांचा संताप

तस्लिमा नसरीन यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओंनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. चितगावमधील या आगीच्या घटनांनंतरही अद्याप एकाही गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस केवळ ‘अज्ञातांविरुद्ध गुन्हे’ दाखल करून वेळ मारून नेत असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे. “हिंदूंच्या रक्ताने बांगलादेशाची माती लाल होत आहे आणि जग केवळ प्रेक्षक बनून पाहत आहे,” अशा जळजळीत शब्दांत नसरीन यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DOJ Release: Trump-Epsteinचे ‘डार्क’ कनेक्शन; ट्रम्पविरुद्ध महिलांवर अत्याचार अन् ‘Lolita Express’मध्ये प्रवासाचे धक्कादायक पुरावे

असुरक्षित अल्पसंख्याक आणि जागतिक चिंता

बांगलादेशातील या ताज्या घडामोडींमुळे भारतातील हिंदू समुदायात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता केवळ बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न उरलेला नाही, तर तो मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा मोठा मुद्दा बनला आहे. जर तात्काळ कडक पावले उचलली गेली नाहीत, तर ही परिस्थिती गृहयुद्धाकडे वळू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लक्ष्मीपूरमध्ये ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू कसा झाला?

    Ans: कट्टरपंथीयांनी एका हिंदू कुटुंबाच्या घराला बाहेरून कुलूप लावून पेट्रोल टाकून पेटवून दिले, ज्यामुळे त्या आगीत ७ वर्षांच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला.

  • Que: दीपू चंद्राची हत्या का करण्यात आली?

    Ans: दीपू चंद्रावर ईशनिंदेचा खोटा आरोप लावून त्याला जमावाने मारहाण केली. तपासात ही हत्या कारखान्यातील अंतर्गत वादातून झाल्याचे समोर आले आहे.

  • Que: तस्लिमा नसरीन यांनी कोणता व्हिडिओ शेअर केला आहे?

    Ans: नी चितगावमधील हिंदूंची घरे इस्लामिक कट्टरपंथीयांकडून जाळली जात असल्याचा खळबळजनक व्हिडिओ पुराव्यासह प्रसिद्ध केला आहे.

Web Title: Taslima nasreens sensational revelation shocking video of hindu houses being set on fire goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • Bangladesh violence
  • international news
  • Taslima Nasreen
  • viral video

संबंधित बातम्या

एका फोटोने केला घात! नदीकिनारी फोटोशूट करत होती महिला, तितक्यात लाट आली अन्… घटनेचा लाइव्ह Video Viral
1

एका फोटोने केला घात! नदीकिनारी फोटोशूट करत होती महिला, तितक्यात लाट आली अन्… घटनेचा लाइव्ह Video Viral

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज
2

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज

Priyanka Gandhi as PM : प्रियांका गांधींना पंतप्रधान करा..! राहुल गांधींना डावलून कॉंग्रेस नेते का करतायेत मागणी?
3

Priyanka Gandhi as PM : प्रियांका गांधींना पंतप्रधान करा..! राहुल गांधींना डावलून कॉंग्रेस नेते का करतायेत मागणी?

बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक
4

बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.