Thailand shoots down Cambodian F-16 rockets in air strike
थायलंड आणि कंबोडियामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. गुरुवारी (२४ जुलै) दोन्ही देशांत अंदाधुंद गोळीबार सुरु झाला होता. यामध्ये दोन थाई सैनिक गंभीर जखमी झाले होते. दरम्यान आता या युद्धाने अधिक तीव्र रुप घेतले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. आतापर्यंतच्या संघर्षात९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जखमी झाले आहेत.
थायंडलने कंबोडियावर हवाई हल्ला केला आहे. थायलंडच्या लष्कराने, कंबोडियाच्या F-16 लढाऊ विमानावर हल्ला केला आहे. तसेच एका लष्करी तळाला उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तर कंबोडियाने देखील हल्ला केला आहे. कंबोडियने केलेल्या हल्ल्यात थायलंडचे पेट्रोल पंप उद्ध्वस्त झाले आहे. BM-21 रॉकेटने हल्ला करण्यात आला असून यानंतर बॅंकॉकमध्ये खळबळ उडाली आहे.
⚡️BM-21 rockets DESTROY gas station in Thailand
Cambodian and Thai troops CLASH; reports of multiple victims
2 deaths and injured many school children and civilians — unconfirmed reports https://t.co/tdHM3WTDXs pic.twitter.com/u28Uzpwufk
— RT (@RT_com) July 24, 2025
दोन्ही देशांतील तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे. थायलंडच्या या हल्ल्याला कंबोडियाने क्रू आणि बर्बर लष्करी आक्रमण म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशाच्या सैन्येत या भागात अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही देशांतील संघर्ष हा पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वी देखील अनेक वेळा सीमेवर सैनिकांमध्ये गोळीबारच्या घटना घडल्या आहे. दोन्ही देश एकमेकांनी हल्ल्यास सुरुवात केली असल्याचा आरोप करत आहे.
हा वाद थायलंड आणि कंबोडियासाठी ऐतिहासिक वाद आहे. प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषित करण्यात आले होते. परंतु थायलंड या मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक वाद वाढत चालला आहे. २००८ मध्ये जागतिक वारसा यादीत यामंदिराचे नाव सामील झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्षा झाला होता. आता हा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.
दरम्यान तणावात वाढ होत असतानाच थालंडमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सल्ला जारी केला आहे. अमेरिकन नागरिकांना तातडीने सीमावर्तीत भागातून आणि हवाई तळांपासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. लोकांचा थायलंड सरकारच्या आदेशांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘येथून परत जा, नाहीतर…’ ; अमेरिकन नौदलाच्या जहाजाला इराणची चेतावणी