Middle East War : 'येथून परत जा, नाहीतर...' ; अमेरिकन नौदलाच्या जहाजाला इराणची चेतावणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान : अमेरिका आणि इराणमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. अमेरिकेच्या इस्रायलला पाठिंब्याने आणि इराणच्या अणु केंद्रावरील हल्ल्याने संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणने बुधवारी २३ जुलै रोजी एक मोठा दावा केला आहे. इराणने म्हटले आहे की, त्यांनी अमेरिकन नौदलाच्या विध्वंसक जहाज यूएसएस फिट्झगेरला मार्ग बलदण्यास भाग पाडले. मात्र, अमेरिकेने इराणच्या या दाव्याला फोटाळून लावले आहे. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
इराणने अमेरिकेच्या जहाजाला रेडिओद्वारे परत जाण्याचा संदेश दिला अशी माहिती इराणी माध्यमांनी दिली आहे. यासंबंधी माध्यमांनी हेलिकॉप्टरने काढलेले फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग देखील प्रसारित केले आहे. यामध्ये एका जहाजाला इराणच्या होमुर्झ सामुद्री हद्दीत घुसखोरी करताना दिसले. यामुळे या जहाजाला इराण नौदलाकडून परत जाण्याची चेतावणी देण्यात आली. इराणी माध्यमांनी अमेरिकेच्या या पवाला उकसवणारे असल्याचे म्हटले आहे. माध्यमांनी सांगितले की, इराणच्या सागरी प्रादेशिक भागाचे निरीक्षण करणाऱ्या जहाजाला सैन्याने परत जाण्यास भाग पाडले आहे. हे जहाज अमेरिकेचे होते असा दावा माध्यमांनी केला आहे.
मात्र इराणच्या या माहितीला अमेरिकेने चुकीचे म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने इराणचा दावा स्पष्ट फेटाळून लावला आहे. इराण चुकूचू माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेन म्हटले आहे. मात्र इराणच्या या दाव्यामुळे दोन्ही देशातील सागरी तणाव देखील वाढण्याची शक्यता आहे.
#Iran warned a #US destroyer ‘Fitzgerald’ to change course after it approached waters being monitored by Iran, leading the US destroyer to turn away. pic.twitter.com/6lf3waqjGw
— IDU (@defencealerts) July 23, 2025
इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेने देखील उडील घेतली होती. अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणु ठिकाणांवर हल्ला केला होता. यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय १२ दिवसांच्या इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रमांना नष्ट करण्याची धमकी दिली होती. यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत गेला आहे.
शिवाय गेल्या काही काळात होमुर्झ सामुद्रधुनी आणि ओमानच्या आखाती क्षेत्रात दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत आहे. तसेच युद्धबंदीनंतरही अणु चर्चेला सुरुवात करण्यात आलेली नाही. यामुळे हा तणाव अधिक वाढत चालला आहे.