Thailand-Cambodia conflict flares up again Troops from both countries face off after ceasefire
Thailand Combodia War : थायलंड आणि कंबोडियातील यद्धबंदी अजून २४ तसासही पूर्ण झालेले नसताना संघर्ष पुन्हा उफाळला आहे. दोन्ही देशाचे सैनिक पुन्हा एकदा सीमेवर आमने-सामने आले आहे. कंबोडियाने मध्येरात्रीनंतर अनेक भागात हल्ला केल्याचा दावा थायलंडने केला आहे, मात्र कंबोडियाने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या सैन्याकडून कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसल्याचे कंबोडियने म्हटले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षा काल २८ जुलै रोजी ब्रेक लागला होता. मलेशियाच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली होती. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी चर्चा करुन शांतता प्रस्थापित करुन आणली होती. दोन्ही देशांनी कोणत्याही अटींशिवाय तात्काळ युद्धबंदी लागू केली. मात्र, पुन्हा एकदा दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे.
दोन्ही देशांच्या संघर्षात आतापर्यंत हजारो लोकांना आपले राहते घर सोडून विस्थापित व्हावे लागले आहे. शिवाय ३३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धबंदी होऊनही तणावामध्ये अद्यापही अनिश्चितता आहे. काही भागांमध्ये शांततचे वातावरण आहे, तर काही भागांमध्ये तणापूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे.
थायलंडने युद्धबंदी करारानुसा, त्यांच्या सैन्याने सर्व लष्करी हालचाली बंद केल्याचा दावा केला आहे, मात्र कंबोडियाने हल्ले सुरुच ठवेले आहेत. अशी माहिती थायलंडचे लष्करी प्रवक्त्यांनी दिली आहे. याच्या प्रत्युत्तारत थाई सैन्य देखील त्यांच्या सुरक्षेसाठी हल्ला करत आहे. दोन्ही देश एकमेकांवर जाणूनबुजून युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. मात्र कंबोडियाने थायलंडचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. युद्धबंदी लागू झाल्यापासून त्यांच्या सैन्याने देखील कोणताही हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारी २४ जुलै रोजी दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात भुसुरुंग स्फोटात पाच थाई सैनिक जखमी झाले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये गोळीबारा सुरु झाला. गेल्या अनेक काळापासून हा वाद सुरु आहे. प्रेह विहार या मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. या वादामुळे आतापर्यंत २६ हजारांहून अधिक लोक आपले घर सोडून पळून गेले आहे. हा वाद पुन्हा वाढत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एका युद्धाची भीती निर्माण झाली आहे.