Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थायलंड-कंबोडियात पुन्हा संघर्षाची लाट! शांतताचर्चांदरम्यान सीमेवर थाई सैनिकांकडून सीमेवर जोरदार हवाई हल्ले

Thailand Cambodia Conflict : थायलंड आणि कंबोडियात पुन्हा एकदा संघर्षाची लाट उसळली आहे. दोन्ही देशांत सीमेवर तीव्र तणाव भडकला आहे. थाई सैनिकांनी जोरदार हवाई हल्ले केले असल्याचा आरोप कंबोडियाने केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 27, 2025 | 09:57 AM
thailand cambodia war

thailand cambodia war

Follow Us
Follow Us:
  • थायलंड-कंबोडियात सीमेवर पुन्हा संघर्ष
  • थाई सैनिकांकडून जोरदार हवाई हल्ले
  • सीमावादामुळे तणाव शिगेला
Thailand Cambodia War News in Marathi : क्वालालंपूर : थायलंड (Thailand) आणि कंबोडियातील संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही देशांत शांतता चर्चा सुरु असताना पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवर पुन्हा चकामक झाली आहे. कंबोडियाने थाई सैनिकांवर जोरदार हवाई हल्ल्याचा आरोप केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रम्प पुन्हा फेल? Thailand Cambodia सीमेवर बारुदी खेळ!

कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने, थायलंडवर सीमेवर F-16 लढाऊ विमानांमधून ४० बॉम्ब डागल्याचा आरोप केला आहे. कंबोडियाच्या उत्तर-पश्चिम भागातील बांटेय मीनच्या प्रांतात एका गावाला लक्ष्य करण्यात आले आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणत्याही जीविताहीनीची घटना घडलेली नाही. परंतु वाढत्या तणावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कंबोडियाने दिलेल्या माहितीनुसार, थालंडच्या हल्ल्यामुळे अनेक घरे, इमारती, आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान थायलंडने या ताज्या हल्ल्याची पुष्टी करताना म्हटले की, ही कारवाई त्यांच्या संरक्षणासाठी करण्यात आली आहे. थाई लष्कराच्या मते, कंबोडियाच्या सीमेलगत केओ प्रांतात सुरक्षेसाठी सेना आणि वायुसेनने ही कारवाई केली आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या भागावरुन तीव्र वाद सुरु आहे.

पाच महिन्यांपूर्वी झाली होती युद्धबंदी

दोन्ही देशात पाच महिन्यांपूर्वी मलेशिया आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीने युद्धबंदी लागू करण्यात आली होती, मात्र दोन्ही देशात ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली आणि तणाव शिगेला पोहोचला. जुलैमध्ये थायलंड आणि कंबोडियात पाच दिवस तीव्र संघर्ष झाला होता. पण ट्रम्प आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी मध्यस्थी करत द्विपक्षीय युद्धबंदी लागू केली होती. ट्रम्प यांच्या दबावामुळे ही युद्धबंदी लागू झाली खरी, पण फार काळ टिकली नाही. दोन्ही देशांनी ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकमेकांवर हल्ले सुरु केले.

का सुरु आहे वाद ?

थायलंड आणि कंबोडियातील वाद काही नवीन नाही. दोन्ही देशात प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषिक केले होते. परंतु या मंदिराचा काही भाग थायलंडच्या भूभागात असल्याने हे मंदिर थायलंडचे असल्याचा दावा केला जातो. तेव्हापासून दोन्ही देशांत राष्ट्रवाद आणि धार्मिक वादाला तोंड फुटवले आहे. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्षा झाला होता. आता हा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.

Thailand Cambodia संघर्षामुळे दशलक्ष लोक घरे सोडून पळाली ; सीमेवर दोन दिवसांपासून गोळीबार सुरुच

Web Title: Thailand cambodia conflict thai soldiers launch airstrikes on border during peace talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • thailand
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.