(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
थायलंडच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल विंथाई सुवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्चाथानी प्रांतात दोन ठिकाणी संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षात एका थाई सैनिकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहे. यापूर्वी जुलै 2025 मध्ये दोन्ही देशांत तीव्र सीमा संघर्ष झाला होता. यानंतर ट्रम्प आणि मलेशियाचे (Malyasia) पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दोन्ही देशात युद्धबंदी घडवूनम आणली होती मात्र हा करार केवळ दोन महिन्यांपूरताच मर्यादित राहिला.
थायलंडने कंबोडियावर सीमेवर चिथावणी देणाऱ्या कुरघोड्या केल्याचा आरोप केला आहे. यामुळे हा संघर्ष सुरु झाला असल्याचे थाई कमांडर्सनी म्हटले आहे. कंबोडियाने देखील थायलंडच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. कंबोडियाने सीमेवर लढाऊ विमाने, जड शस्त्रे आणि सैन्य तैनात केले आहे. यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे कंबोडियाने थायलंडवर द्विपक्षीय शांतता कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या सैन्यावर क्रूर हल्ले केल्याचा आरोप केला आहे. कंबोडियाने थाई सैनिकांनी त्यांच्या सैन्यावर प्रथम हल्ला केल्याचे म्हटले. कंबोडियाच्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्यावर गोळीबार आणि टँक शेल फेकण्यात आले. परंतु त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.
Thailand launches airstrikes on Cambodian military bases after border clash kills 01 Thai soldier. Trump-brokered October ceasefire collapses. Tensions escalate rapidly. pic.twitter.com/HmPLTWeEdi — ARIKA🇮🇳🚩 (@nidhisj2001) December 8, 2025
थायलंड आणि कंबोडियात गेल्या अनेक दशकांपासून सीमावाद सुरु आहे. दरम्यान जुलै २०२५ मध्ये ट्रम्प यांनी मलेशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशात शांतता प्रस्थापित केली होती. २८ जुलै २०२५ रोजी दोन्ही देशात युद्धबंदी लागू झाली होती (Thailand Cambodia Ceasefire) २६ ऑक्टोबर रोजी यांची आसियान शिखर परिषदेत घोषणा करण्यात आली. सध्या दोन्ही देशांतील संघर्ष पुन्हा सुरु झाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ans: दोन्ही देशांतील युद्धबंदी करारचे उल्लंघन झाले असून एकमेकांवर हल्ल्याचा आरोप थायलंड-कंबोडियाने केला आहे. कंबोडियाने थायलंडच्या सीमा भागात चिथावणीखोर कृती केल्यामुळे हा संघर्ष सुरु झाला असल्याचे थायलंडने म्हटले आहे.
Ans: थायलंड आणि कंबोडियात ट्रम्प मध्यस्थी करत द्विपक्षीय शांतता करार घडवून आणला होता.
Ans: सध्या थायलंड-कंबोडिया सीमेवर तणावाचे वातावरण आहे. कंबोडियाने आपले सैन्य आणि शस्त्रे तैनात केली आहेत. तर थायलंडने देखील प्रत्युत्तराची तयारी केली आहे. परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे.






