Thailand Cambodia संघर्षामुळे दशलक्ष लोक घरे सोडून पळाली ; सीमेवर दोन दिवसांपासून गोळीबार सुरुच (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प पुन्हा फेल? Thailand Cambodia सीमेवर बारुदी खेळ!
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या संघर्षात थायंलडमध्ये तीन जणांच्या मृत्यूची तर कंबोडियात सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ८ डिसेंबर रोजी दोन्ही देशांत गोळीबाराला सुरुवात झाली होता. यावेळी थाई सैनिकांचाही मृत्यू झाल आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. याच दरम्यान आश्रयस्थानंमध्ये राहणाऱ्या लोकांनी स्थलांतराला सुरुवात केली आहे. तसेच स्थानिक रहिवाशांनी देखील पलायनास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे १.२५ दशलक्षहून अधिक लोकांनी संघर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत स्थलातर केले आहे.
थायलंड आणि कंबोडियात मे महिन्यात संघर्ष सुरु झाला होता. जो जुलैपर्यंत सुरु राहिला. यानंतर मलेशिया आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन्ही देशांत युद्धबंदी घडवून आणली. सध्या दोन दिवसांपासून दोन्ही देशांत सीमेवर जोरदार गोळीबार सुरु आहे. थायलंडने कंबोडियावर सीमेवर चिथावणी खोर कृती केल्याचा आरोप केला आहे. यामुळे थाई कमांडर्सनी हल्ले केले आहे. तर दुसरीकडे थायलंडवर द्विपक्षीय शांतता कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच सीमेवर लढाऊ विमाने, जड शस्त्रे आणि सैन्य तैनात केले आहे. यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
थायलंड आणि कंबोडियाचा वाद ऐतिहासिक असून प्रेम विहार मंदिरावरुन सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषित केले होते. परंतु थायलंड या मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक वाद वाढत चालला आहे. २००८ मध्ये जागतिक वारसा यादीत यामंदिराचे नाव सामील झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्षा झाला होता. आता हा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.






