Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thailand Visa Rules : थायलंडचा भारतीयांना मोठा दणका! ६० दिवसांची Visa Free Entry बंद; ‘हा’ नवा नियम लागू

Thailand Visa Rules : भारतीय पर्यटकांना थायलंडने मोठा दणका दिला आहे. ६० दिवसांची व्हिसा फ्री-एन्ट्री सुविधा रद्द करण्यात आली आहे. आता पर्यटकांना व्हिसा ऑन अरायव्हल किंवा इ-व्हिसा घ्यावा लागणार आहे, केवळ १५ दिवसांसाठीच मुक्काम करता येणार असून यासाठी फी मोजावी लागणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2026 | 04:46 PM
Thailand Visa Rules

Thailand Visa Rules

Follow Us
Follow Us:
  • थायलंडचा भारतीयांना मोठा दणका
  • ६० दिवसांची व्हिसा फ्री-एन्ट्री केली बंद
  • ‘हा’ नवा नियम लागू
Thailand Visa Rules News in Marathi : बँकॉक : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये थायलंड(Thailand) ला जाण्याचे नियोजन करणाऱ्या भारतीयांना मोठा दणका बसला आहे. थायलंड सरकारने भारतीय नागरिकांना मिळणारी ६० दिवसांची व्हिसा-फ्री एन्ट्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. थाई कॅबिनेटने नुकतेच नव्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल किंवा इ-व्हिसा काढावा लागणार आहे.

थायलंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; धावत्या ट्रेनवर कोसळली भलीमोठी क्रेन, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

आता फक्त १५ दिवसच मुक्काम…

थायलंड सरकाने घेतलेल्या नव्या नियमानुसार, भारतीय पर्यटकांना आता थायलंडमध्ये केवळ १५ दिवसांसाठीच मुक्काम करता येणार आहे. यापूर्वी भारतासह ९३ देशांतील नागरिकांना विनाव्हिसा २ महिने राहण्याची सवलत होती. मात्र, आता प्रवाशांना विमानतळावर उतरल्यावर व्हिसा घ्यावा लागेल. तसेच प्रवासापूर्वी इ-व्हिसासाठीही अर्ज करावा लागले. यासाठी पर्यटकांना सुमारे २५०० थाई भट म्हणजे अंदाजे ५,८०० रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे अचानक ट्रिप प्लॅन करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

काय आहे नेमकं कारण?

कोरोना माहीमारीनंतर देशातील पर्यटनाला गती देण्यासाठी थायलंडने व्हिसा नियमात सवलती दिल्या होत्या. परंतु गेल्या काही महिन्यात पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन, व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीर वास्तव, ऑनलाईन स्कॅम आणि पर्यटनांवरील गैरवर्तनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

विशेष करुन सोशल मीडियावर काही पर्यटकांचे मंदिरामधील हुल्लडबाजीचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने थाई सरकारने कडक पावले उचलली आहेत. यामुळे सीमा सुरक्षेचा हवाला देत सरकारने व्हिसा नियम अत्यंत कडक केले आहेत. सध्या केवळ जुन्या नियमांनुसार, थायलंडमध्ये दाखल झालेल्यांना त्यांच्या ठरलेल्या मुदतीपर्यंत राहण्याची सूट देण्यात आली आहे.

  • भारताशिवाय व्हिसा फ्री-एन्ट्री बंद करण्यात आली आहे.
  • तर अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया आणि युरोपसह ५४  देशांतील पर्यटकांना आता केवळ ३० दिवसांसाठी थायलंडमध्ये राहता येणार आहे.
  • काही देशांसाठी परस्पर कराराच्या आधारे रेसिप्रोकल व्हिसा सूट देण्यात आली आहे.
  • अर्जेंटिना, पेरु, चिली ब्राझील आणि दक्षिण कोरियाला ९० दिवसांची सवलत आहे.
  • तर चीन, हॉंगकॉंग, रशिया, लाओस, मकाऊ, तिमोर-लेस्ते आणि कझाकिस्तान या देशांना ३० दिवसांची सूट देण्यात आली आहे.
  • कंबोडिया आणि म्यानमार केवळ १४ दिवसांची सूट आहे.

पर्यटन क्षेत्रावर परिणाम?

ट्रव्हल एक्स्पर्टच्या मते, या निर्णयाचा सर्वाधिक फटका बजेट ट्रॅव्हलर्स आणि डिजिटल नोमॅड्स यांना बसणार आहे. यामुळे अचानक नियोजन करुन फिरणाऱ्यांची संख्या घटू शकते.

नव्या नियमांमुळे प्रवाशांचा खर्च आणि कागदपत्रांची डोकेदुखी वाढेल. यामुळे भारतीय पर्यटक मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका किंवा बालीसारख्या सोपे व्हिसो नियम असलेल्या देशांना प्राधान्य देतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

थायलंड हादरलं! रेल्वेनंतर महामार्गावर कोसळली क्रेन, गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर, थरारक VIDEO

Web Title: Thailand visa rules stops 60 day visa free entry for indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • thailand news
  • Visa free entry
  • World news

संबंधित बातम्या

US-Iran War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत थरार; जॉर्डनवर 20 क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणकडून अमेरिकेचा पाणबुडी ड्रोन जप्त
1

US-Iran War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत थरार; जॉर्डनवर 20 क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणकडून अमेरिकेचा पाणबुडी ड्रोन जप्त

Trump Putin Call : युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद; रशियाचा युरोपबाबत मोठा खुलासा
2

Trump Putin Call : युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद; रशियाचा युरोपबाबत मोठा खुलासा

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?
3

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा
4

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.