थायलॅंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; धावत्या ट्रेनवर कोसळली भलीमोठी क्रेन, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
थायलंडमध्ये भगवान विष्णूची मुर्ती जमीनदोस्त; भारतातून रोष व्यक्त होताच थाई सरकारने दिले उत्तर
थायलंडमधील ट्रेन अपघाताने (Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॅंकॉकच्या ईशान्येकडे २३० किमी (१४३) अंतरावर असलेल्या नाखोन रत्चासिमा प्रांतात सिखिओमध्ये हा अपघात घडला आहे. बुधवारी (१४ जानेवारी २०२६) रोजी सकाळी ट्रेन उबोन रत्चाथानीकडे रवाना झाली होती. यावेळी अचानक एक भलीमोठी क्रेन ट्रेनवर कोसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावर काम सुरु होते. यावेळी एक क्रेन ट्रेनच्या डब्यावर पडली. यामुळे रेल्वेचा डबा रुळावरुन कोसळला. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, रेल्वेचा चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर रेल्वेला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यात आली असून लोकांच्या बचावचे कार्य सुरु आहे. क्रेन आणि ट्रेनमधील धडक एवढी जोरदा होती की ट्रेनचे छत पूर्णपमे कोसळले आहे. खिडक्या, दरवाजे तुटले आहेत.
सध्या मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रेन आणि ट्रेन एकात अडकेल्या ती वेगळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे,
DEVELOPING: Dozens of people have been killed and injured after a construction crane lifting a section of a bridge collapsed onto a passenger train in Sikhio, Thailand. Contributed by @AZ_Intel_. pic.twitter.com/wnYDIszrrs — Open Source Intel (@Osint613) January 14, 2026
‘हा हिंदूंचा अपमान…’ ; कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड; भारताने घेतला आक्षेप
बातमी अपडेट होत आहे.






