Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापत सुरुच; ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्ध्वस्त केलेला ‘तो’ तळ पुन्हा उभा केला

एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्ध्वस्त केलेला एक दहशतवादी तळ पुन्हा उभारला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापतींचा पुन्हा एकदा खुलासा झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2025 | 06:07 PM
The terrorist camp of Bahawalpur Jaish-e-Mohammed has been activated again

The terrorist camp of Bahawalpur Jaish-e-Mohammed has been activated again

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan News Marathi : इस्लामाबाद : एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्ध्वस्त केलेला एक दहशतवादी तळ पुन्हा उभारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद तळ भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त केला होता. हा तळ पाकिस्तानमध्ये पुन्हा उभारला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापती उघडकीस आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच या तळाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पाकिस्तान पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील हा मोठा दहशतवादी तळ आहे

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनला आता गाजवयाचे अंतराळात वर्चस्व; ISRO आणि NASA च्या मोहिमेनंतर केली मोठी यशस्वी चाचणी

पहलगाम हल्ला

भारताच्या जम्मू आणि काश्मीरमदील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ निरापराध लोकांचा मृत्यू झाला होता. याविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली होती. यामध्ये पंजाबच्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा तळही उद्ध्वस्त करण्यात आला होता. सध्या हा तळ पुन्हा उभारला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी बहावलपूरच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

जैश-ए-मोहम्मद तळ

या जैश-ए-मोहम्मद तळाच्या प्रशिक्षण शिबिरात एक स्विमिंग पूल आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ऑपरेशन सिंदूरनंतर हा तळ बंद करण्यात आला होता. परंतु आता हा तळ पुन्हा एकदा उभारला जात आहे. तसेच या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिले जात असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय जैश-ए-मोहम्मदच्या मदरसा देखील या ठिकाणी आहे. ही मदरसा देखील पुन्हा उभारली जात आहे.

या ठिकाणी मरकज सुभान अल्लाह हे जैशचे सर्वात प्रमुख स्थळ मानले जाते. या ठिकाणी जैशचे मौलाना मसूद अझहरचे लपण्याचे ठिकाण असल्याचे म्हटले जाते. हे मुख्यालय बहावलपूर मरकझ नियंत्रण रेषेच्या १०० किमी आत आहे. भारताच्या हल्ल्यात हे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. तसेच यामध्ये मसूदच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला होता.

ऑपरेशन सिंदूर

भारताने पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरु केली. या मोहिमेअंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. तसेच यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली होती. मात्र बारताने पाकिस्तानच्या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्याला पाठिंब्याचा जागतिक स्तरावर देखील खुलासा केला. मात्र अजूनही पाकिस्तानच्या भारतविरोधी कुरापती सुरुच आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- US Canada Tariff War : कॅनडाने अमेरिकेवरील डिजिटल कर लादण्याचा निर्णय घेतला मागे; नेमकं कारण तरी काय?

Web Title: The terrorist camp of bahawalpur jaish e mohammed has been activated again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
1

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
2

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार
4

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.