बांगलादेशात हजारो हिंदू उतरले रस्त्यावर; हल्ले आणि छळामुळे सुरक्षेची मागणी
ढाका: बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सरकारच्या हकालपट्टीनंतर हिंदूवरील हल्ले वाढले आहेत. आत्तापर्यंत अनेक हल्ले झाले असल्याचा दावा केला जात आहे. तसेच नवीन नियुक्त सरकार स्थापन झाल्यानंतरही हिंदूंवरील अत्याचार वाढत चालला आहे. त्यामुळे नवनियुक्त युनूस सरकार विरोधात बांग्लादेशांतील हिंदूंनी उठाव केला आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदाय रस्त्यावर उतरले आहेत. हिंदूंवर होणारे हल्ले आणि छळामुळे सुरक्षेच्या मागणासाठी हजारो लोक मोर्चे काढत आहेत. बांगलादेशमधील हिंदूमध्ये तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे.
अंतरिम सरकारकडून संरक्षणाची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्वेकडील चितगाव शहरात हजारो हिंदूंनी रॅली काढत अंतरिम सरकारकडून संरक्षणाची मागणी केली. 30,000 हून अधिक लोक एकत्र येऊन घोषणाबाजी देत आहेत. तर देशातील इतर ठिकाणीही निदर्शने झाली. तसेच हिंदू गटांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान शेख हसीना यांच्या धर्मनिरपेक्ष सरकारची हकालपट्टी झाल्यानंतर हिंदूंवर हजारो हल्ले करण्यात आले आहेत. 4 ऑगस्टपासून 2,000 हून अधिक हल्ल्यांची नोंद झाली आहे. या परिस्थितीमध्ये नवनिर्मित अंतरिम सरकारने हिंदू समुदायाला पुरेसे संरक्षण दिले नसल्याचे म्हटले जात आहे. कट्टरपंथी इस्लामवादी आता अधिक प्रभावशाली होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांत असंतोष
बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांची तीव्रता चिंताजनक बनलेली आहे. विशेषत: हिंदू समाजावर होण्याऱ्या हल्ल्यानमतर परिस्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे. यामुळे हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांत असंतोष वाढत चालला आहे. ‘बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल’ने सरकारच्या संरक्षणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः कट्टरपंथी इस्लामवादी गटांच्या वाढत्या प्रभावामुळे.
रॅलीत सहभागी झालेल्या लोकांवर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप
25 ऑक्टोबरच्या रॅलीत सहभागी झालेल्या लोकांवर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे देशद्रोहाच्या अंतर्गत 19 हिंदू नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनांवर हिंदू समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बांगलादेशातील हिंदू समाजाच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. शनिवारी आणखी एक रॅली काढण्याची योजना आहे. यामुळे हिंदू समाजाच्या सदस्यांनी आपल्या हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. हे सर्व घटनाक्रम बांगलादेशातील धार्मिक सहिष्णुतेसाठी एक मोठा आव्हान आहे.
हे देखील वाचा- रॉकेट आणि मिसाईल हवेतच गायब होणार! इस्रायलचा हा ‘बाहुबली’ शत्रूंचे होश उडवणार