शेख हसीना यांच्या पतनानंतर पहिल्यांदाच 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली बांगलादेशाची भेट
ढाका: शेख हसीना यांच्या पतनानंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या राष्ट्रपतींनी बांगलादेशला भेट दिली आहे. तिमोर-लेस्ते चे राष्ट्रपती जोस रामोस-होर्ता यांनी ढाका येथे बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस आणि परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. त्यांनी परस्पर हितसंबध वाढवम्यावर चर्चा केली. तिमिर-लेस्टे हा दक्षिणपूर्व आशियातील एक छोटा देश आहे. हा देश 2002 मध्ये इंडोनेशियापासून वेगळा झाला.
परस्पर संबंध दृढ करण्यावर भर
राष्ट्राध्यक्ष जोस रामोस आणि मोहम्मद तौहीद हुसैन यांच्यातील भेटीत दोन्ही देशांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यावर जोर देण्यात आला. यानंतर राष्ट्रपती जोस रामोस यांनी मोहम्मद युनूस यांची भेट घेतली. या चर्चेत परस्पर हिताचे विषय, द्विपक्षीय संबंध, आणि भविष्यातील सहकार्याच्या संधी यांवर चर्चा करण्यात आली. ही भेट फलदायी ठरली असून, दोन्ही देशांनी आपापल्या देशांमधील सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने विचार मांडले.
Chief Adviser Professor Muhammad Yunus hosts Timor-Leste President Jose Ramos-Horta at his office in Dhaka on Sunday.
Photos: CA Press Wing#Bangladesh #TimorLeste #ChiefAdviser pic.twitter.com/eZwz1IQKp1
— Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) December 15, 2024
दोन महत्त्वपूर्ण करार
या भेटीदरम्यान दोन महत्त्वाच्या करारवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या भेटीदरम्यान बांगलादेश आणि तिमोर-लेस्टे यांच्यात दोन महत्त्वाचे करार (MOU) करण्यात आले. पहिला करार द्विपक्षीय सल्लामसलतीबाबत होता, तर दुसरा करार व्हिसा प्रक्रियेत सवलत देण्याबाबत होता. या करारांमुळे दोन्ही देशांमधील नागरिक आणि व्यापाऱ्यांना परस्पर प्रवास व सहकार्य सुलभ होईल.
राष्ट्रपतींचा शानदार स्वागत
शेख हसीना यांच्या कार्यकाळानंतर बांगलादेशमध्ये एखाद्या राष्ट्रपतीचा हा पहिलाच दौरा असल्याने मोहम्मद युनूस यांच्या सरकारने राष्ट्रपती जोस रामोस यांचे भव्य स्वागत केले. त्यांना सशस्त्र दलांच्या पथकाकडून गार्ड ऑफ ऑनर आणि राजकीय सलामी देण्यात आली. राष्ट्रपतींनी या दौऱ्यात लिबरेशन डे कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होण्याचे मान्य केले आहे.
2002 मध्ये इंडोनेशियापासून स्वतंत्र झालेला तिमोर-लेस्ते हा एक छोटा परंतु महत्त्वाचा देश आहे. जोस रामोस यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक व आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण-पूर्व आशियात बांगलादेशची भूमिका अधिक प्रभावी होण्यास मदत होईल.