Top 10 countries which spend the most on weapons List released amid India-Pakistan tension
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. यामुळे पुन्हा एकदा या देशांतील लष्करी ताकदीची चर्चा होत आहे. याच तणावादरम्यान एक धक्कादायक अहवाल समोर आला.
या अहवालामध्ये जगातील शस्त्रास्त्रांवर सर्वात जास्त खर्च करणाऱ्या दहा देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या देशाने किती लष्करी गुंतवणूक केली याबाबत या अहवालात सांगण्यात आले आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा नेमका कितवा क्रमांक आहे हे आपण जाणून घेऊयात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनमधे भीषण दुर्घटना; रेस्टॉरंटमधील आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू
तर स्टॉकहोम इंटरनॅशन पीस रीसर्च इन्स्टिट्यूने (SIPRI) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 2024 मध्ये जगाचा एकूण लष्करी खर्च 2.72 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. हा खर्च 2023च्या तुलनेत 9.4% अधिक आहे. SIPRI ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जगभारतील वाढत्या तणावामुळे लष्करी खर्च वाढला आहे. यामध्ये विशेष करुन युरोप आणि मध्ये पूर्वेतील देशांनी त्यांच्या संरक्षण खर्चात लक्षणीय वाढ केली आहे.
अहवालात प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये 100 हून अधिक देशांनी देशाच्या संरक्षणासाठी लष्करी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, अलीकडच्या काळात अनेक देशांनी लष्करावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तर इतर महत्वाच्या क्षेत्रांमध्ये बजेट कमी केले आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि समाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
SIPRI च्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, युक्रेन युद्धानंतर युरोपमध्ये लष्करी खर्चात लक्षणीय वाढ होत चालली आहे. शीतयुद्धानंतर युरोपने मोठ्या प्रमाणात आपल्या संरक्षण खर्चामध्ये वाढ केली आहे. एवढी मोठ्या प्रमाणात लष्करी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची ही युरोपची पहिलीच वेळी आहे. सध्या रशिया-युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता, तसेच पुतिन यांचे हेतू पाहता युरोपने हा निर्णय घेतला आहे. युरोपच्या मते रशियाला केवळ युक्रेनवरच नव्हे तर संपूर्ण युरोपवर राज्य प्रस्थापित करायचे आहे.
दरम्यान अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये रशियाने सुमारे 149 अब्ज डॉलर्स लष्करी खर्च केला आहे. रशियाचा हा खर्च 2023च्या तुलनेने 38% पेक्षा जास्त आहे. रशियाच्या एकूण जीडीपीच्या 7.1% आणि सरकारी खर्चाच्या 19% ने 2024 चा लष्करी खर्च जास्त आहे.
अहवालानुसार, युक्रेनचा एकणू लष्करी खर्च 2.9% वाढला आहे. 2024 मध्ये युक्रेनने शस्त्र खरेदीवर सर्वाधिक पैसे खर्च केले आहेत. SIPRIच्या अहवालानुसार, युक्रेनचा हा खर्च एकूण उत्पन्नाच्या 34% जास्त आहे आणि केवळ शस्त्रास्त्रांवर आहे. यामुळे युक्रेनला येत्या काही काळात इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या अडणींचा सामाना करावा लागणार आहे,
अमेरिकेनेही लष्करी खर्चात 5.7% ने वाढ केली आहे. 2024 मध्ये अमेरिकेने संरक्षणा खर्चावर 997 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवला आहे. अमेरिकेनंतर संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये चीन, रशिया, जर्मनी आणि भारत या देशांचा समावेशी आहे. या देशांनी एकत्र मिळून केलेला खर्च जगातील एकूण लष्करी खर्चाच्या 60% अधिक आहे. या देशांनी शस्त्रास्त्रांवर 1 हजार 635 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणा देश चीन आहे. 2024 मध्ये चीनने अंदाजे 314 अब्ज डॉलर्स खर्च केला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा खर्च गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे.
भारत हा लष्करी खर्चामध्ये पाचव्या स्थानी आहे. 2024 मध्ये भारताने 1.6% खर्च वाढवून 86.1 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवला आहे. जपानने लष्करी खर्च 21% वाढवत 55.3 अब्ज पर्यंत खर्च केला आहे.
तैवान आपला लष्करी खर्च 1.8% ने वाढवत 16.5 अब्ज डॉलर्स 2024 मध्ये खर्च केले आहेत. तर पाकिस्तान या यादीत 29 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने सुमारे 10.2 अब्ज डॉलर्सचा खर्च शस्त्रास्त्रांवर केला आहे.