Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत भीषण हेलिकॉप्टर अपघात; हडसन नदीत कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य निष्फळ

अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात गुरुवारी (10 एप्रिल) एक भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. पर्यटकांना नेणारे हे बेल 206 हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळले, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 11, 2025 | 12:00 PM
Tourist helicopter crashes into Hudson River NYC on April 10

Tourist helicopter crashes into Hudson River NYC on April 10

Follow Us
Close
Follow Us:

न्यू यॉर्क : अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात गुरुवारी (10 एप्रिल) एक भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. पर्यटकांना नेणारे हे बेल २०६ हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळले, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये स्पेनमधील एकाच कुटुंबातील पाच सदस्य आणि पायलट यांचा समावेश आहे.

या दुर्घटनेनंतर न्यू यॉर्क शहरातील आपत्कालीन सेवांनी त्वरीत शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. हेलिकॉप्टरमधून सर्व सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, मात्र त्यातील दोघांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. न्यू यॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी हा अपघात हृदयद्रावक असल्याचे सांगत शोक व्यक्त केला.

स्पेनमधील उद्योगपती आणि त्यांचे कुटुंब अपघाताचा बळी

न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टरमधील प्रवासी स्पेनमधील सीमेन्स स्पेनचे अध्यक्ष आणि सीईओ ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुलगे होते. एस्कोबार यांचे कुटुंब अमेरिकेत सुट्टी घालवत होते, मात्र त्यांच्या या सहलीचा दुर्दैवी शेवट झाला. महापौर एरिक अॅडम्स म्हणाले, “ही घटना अत्यंत दुःखद आहे. संपूर्ण कुटुंब एका क्षणात गमावल्याने आम्ही सर्वजण हळहळत आहोत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पंजाबींनंतर आता पहिल्यांदाच गुजरातींचाही राजकारणात प्रवेश; कॅनडात भारतविरोध होणार क्षीण

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त करत ट्विटरसारख्या त्यांच्या ‘ट्रुथ’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. त्यांनी लिहिले, “हडसन नदीत भयंकर हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. पायलट, दोन प्रौढ आणि तीन निरागस मुले यांचे प्राण गेले आहेत. अपघाताचा व्हिडिओ अत्यंत भयानक आहे. देव त्यांच्या कुटुंबियांना बळ देवो.” ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले की, अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी आणि त्यांची टीम या अपघाताची चौकशी करत आहे.

अपघात नेमका कसा घडला?

न्यू यॉर्कच्या पोलिस आयुक्त जेसिका टिश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे हेलिकॉप्टर न्यू यॉर्क हेलिकॉप्टर टूर्स कंपनीचे होते. दुपारी ३:०० वाजता हे हेलिकॉप्टर शहरातील एका हेलिपॅडवरून उड्डाण केले. त्यानंतर हडसन नदीच्या उत्तरेकडे त्याचा प्रवास सुरू झाला. जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजच्या जवळ आले असताना ते अचानक दक्षिणेकडे वळले. काही क्षणांतच नियंत्रण सुटल्याने हेलिकॉप्टर उलटले आणि थेट नदीत कोसळले. दुपारी ३:१५ वाजता लोअर मॅनहॅटनजवळ हा अपघात झाला.

व्हिडिओमध्ये कैद झाला भीषण क्षण

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक मोठी वस्तू वेगाने पाण्यात पडताना दिसते. त्यानंतर हेलिकॉप्टरचे ब्लेडसारखी रचना काही सेकंदांसाठी पाण्याच्या वरती दिसते आणि लगेचच पाणी शांत होते. हेलिकॉप्टर कोसळताच आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाली. पोलिस, अग्निशमन विभाग आणि कोस्ट गार्ड यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि शोधमोहीम सुरू केली.

#BREAKING #USA #NEWYORK #NY

Did you notice this👇

🔴 NEW YORK :📹MOMENT OF CRASH VIDEO SHOWS NO ROTORS, NO TAIL ON CHOPPER

On board, there was the pilot and a Family from Spain -2 adults and 3 KIDS-, who were visiting U.S, taking a tour of New York City.
All died.
-AP pic.twitter.com/E4jQSUSVVC

— LW World News 🌏 (@LoveWorld_Peopl) April 10, 2025

credit : social media

चौकशी आणि संभाव्य कारणे

सुरुवातीच्या तपासात तांत्रिक बिघाड किंवा पायलटचा नियंत्रण गमावणे ही संभाव्य कारणे असू शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) यांनी संयुक्त चौकशी सुरू केली आहे. NTSB अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स आणि इतर महत्त्वाचे डेटा रेकॉर्डर्स लवकरच सापडतील, जे अपघाताचे खरे कारण स्पष्ट करण्यास मदत करतील.

न्यू यॉर्कच्या पर्यटन हेलिकॉप्टर सेवांवर प्रश्नचिन्ह

हा अपघात घडल्यानंतर न्यू यॉर्कमधील पर्यटन हेलिकॉप्टर कंपन्यांवरील टीका वाढली आहे. गेल्या काही वर्षांतही हेलिकॉप्टर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हडसन नदी परिसरात याआधीही अनेक छोटे अपघात घडले आहेत. त्यामुळे पर्यटन हेलिकॉप्टर कंपन्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Ram Mandir: पाकिस्तानात बांधले जात आहे भव्य राम मंदिर! भारतातून आणली जाणार ‘ही’ खास वस्तू

 शोक आणि नवीन सुरक्षेच्या गरजा

या दुर्दैवी अपघातामुळे न्यू यॉर्क शहर हादरले असून, स्पेनमध्येही या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिका आणि स्पेनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त चौकशीसाठी तयारी केली आहे. पर्यटन हेलिकॉप्टर कंपन्यांसाठी नवीन सुरक्षाविषयक नियम लागू होण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात हेलिकॉप्टरच्या देखभालीसाठी कठोर नियम आखले जाऊ शकतात. या अपघाताने सहलीसाठी आलेल्या एका संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागला, आणि त्यामुळे जागतिक पातळीवर हवाई सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत नवा विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Tourist helicopter crashes into hudson river nyc on april 10 nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • America
  • helicopter crash
  • New York city

संबंधित बातम्या

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
1

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
2

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
3

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
4

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.