Train attack by terrorists in Pakistan a sign of China's destruction What is the exact connection
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये मंगळवारी (11 मार्च ) बंडखोर गट बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) मोठी कारवाई केली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. बलुच लिबरेशन आर्मी या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गटाने क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला करुन अपहरण केले आहे. या घटनेत पाकिस्तानचे किमान 30 सुरक्षा दलांचे सैनिक मृत्यूमुखी पडले असून 400 हून अधिक लोकांना ओलिस ठेवण्यात आले. मात्र हा हल्ला चीनच्या पाकिस्तानमधील प्रभावाच्या समाप्तीचा असल्याचे म्हटले जात आहे.
बंडखोरांनी महिला, वृद्ध आणि लहानामुलांसह काही नागरिकांची सुटका केली आहे. मात्र अजूनही 200 पेक्षा जास्त लोक बलुच लिबरेशन आर्मीच्या (BLA) कैदेत आहेत. BLA ने सोशल मीडियावर जारी केलेल्या निनवेदनानुसार, ही कारवाई मश्काफ, धादर, बोलान या भागांत करण्यात आली आहे. सैनिकांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला ज्यामुळे जाफर एक्सप्रेस थांबवावी लागली याच दरम्यान बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) ट्रेनवर हल्ला केला आणि सर्व प्रवाशांना ओलिस ठेवले.
दहशतवादी हल्ल्याचा चीनशी संबंध
मात्र, या दहशतवादी हल्ल्याचा चीनशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) आणि ग्वादर बंदरासाठी हा हल्ला धोकादायक मानला जात आहे. गेल्या काही काळात बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ लढणाऱ्या विविध गटांनी बलूच राजी आजोई संगार (BRAS) या गटाखाली एकत्र येण्याची घोषणा केली होती. या नव्या योजनेअंतर्गत या गटांनी पाकिस्तान आणि चीनविरोधात संयुक्त लष्करी आणि रणनीतिक मोहीम राबवणार असल्याचे सांगण्यात आले होते.
ग्वादरमधील चीनच्या गुंतवणूकीला धोका
BLA गेल्या काही वर्षात बलुचिस्तानमध्ये चीनच्या ग्वादर बंदराविरोधात अनेक कारवाया केल्या आहेत. BLA ने आरोप केला आहे की, चीन बलुचिस्तानचे शोषण करुन त्यावर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने ग्वादर बंदरात जवळपास 62 डॉलर्सची गुंतवणूक आहे. मात्र चीनच्या CPEC प्रकल्पासाठी आणि ग्वादर बंदरासाठी BLA चा हा हल्ला मोठा धोकादायक मानला जात आहे.
पाकिस्तान सैन्यासमोर मोठे आव्हान
पाकिस्तान व्यवहार तज्ञ तिलक देवशर यांनी म्हटसे की, “BLA ने केलेला हल्ला हा बलुचिस्तानमध्ये दहशतवादाचे एक गंभीर रूप आहे. काही काळापूर्वी बलुच आर्मीच्या लोकांनी एकजुटीने लढण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर काही काळातच ही घटना घडली. ही कृती दहशतवादाच्या एकतेचे हे पहिले लक्षण आहे. पाकिस्तानी सैन्यासोमर मोठी अडचणे निर्माण झाली आहेत. तसेच चीनच्या प्रकल्पाविरोधी बंडखोरांची ही भूमिका मोठे आव्हान ठरणार आहे.