Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा खुपसले नाक! भारत रशियाकडून डिसेंबरपर्यंत तेल खरेदी करणार बंद

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रशियाच्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 23, 2025 | 02:52 PM
Trump again claims India will stop buying russian oil by year end

Trump again claims India will stop buying russian oil by year end

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांनी पुन्हा भारत रशिया संबंधात खुपसले नाक
  • पुन्हा भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा केला दावा
  • भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही

Trump on India Russia Oil Trade : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वत: याची खात्री केली असल्याचे म्हटले आहे. ट्रन्प यांचा हा दावा अशा वेळी आला आहे, जेव्हा त्यांनी रशियच्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा; ट्रम्प यांनी हिंदूंना शुभेच्छा देत पुन्हा केला PM मोदींसोबत संवादाचा दावा

बुधवारी (२२ ऑक्टोबर) व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी हा दावा केला. त्यांनी म्हटले की, तेल खरेदी एकदम थांबवता येत नाही, परंतु या वर्षाच्या अखेरपर्यंत डिसेंबरपर्यंत भारत तीन शून्यावर नेईल. मी पंतप्रधान मोदींसी यावर चर्चा केली आहे. त्यांनी याची खात्री देखील दिली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्याभरात ट्रम्प यांनी पाचव्यांदा रशियन तेल खरेदीच्या मुद्यावरुन भारतावर निशाणा साधला आहे.

‘India has been great but China is different. By the end of this year, India’s oil purchases from Russia will be almost nothing. I spoke to PM Modi about this,’ says Donald Trump after sanctioning Russian oil firms pic.twitter.com/L6SZyLiiT5 — Shashank Mattoo (@MattooShashank) October 23, 2025

रशियाच्या तेल कंपन्यांवर निर्बंध

दरम्यान याच वेळी ट्रम्प यांनी रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादला आहे. बुधवारी (२२ ऑक्टोबर) त्यांनी दोन प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर बंदी घातली. हे पाऊल उचलून ट्रम्प यांनी थेट राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान दिले. हे पाऊल रशियावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाबाबत कारवाई केली आहे. अमेरिकेने रशियाच्या रोसनेफ्ट आणि लुकोइल कंपन्यांवर बंदी घातली आहे.

भारतावर होणार परिणाम? 

ट्रम्प यांनी रशियाच्या रोसनेफ्ट आणि लुकोइल कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामुळे भारतावर लक्षणीयरित्या परिणाम होण्याची शक्यता आहे.  भारत दोन्ही कंपन्यांकडून तेल खरेदी करतो. यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान भारताने अंदाजे १.७३ दशलक्ष बॅरल प्रतिदि कच्चे तेल रशियाकडून खेरदी केले आहे.

भारताला आयात दराच्या तुलनेत स्वस्त दरात तेल मिळते. भारताने रशियन तेल खरेदी करण्याबाबत आपली स्पष्ट भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी म्हटले आहे की ते आपल्या लोकांच्या हिताच्या आधारे निर्णय घेतात. दरम्यान, रशियन कंपनीवरील बंदी भारतावरही परिणाम करू शकते.

FAQs(संंबंधित प्रश्न) 

प्रश्न १. ट्रम्प यांनी भारत रशिया बद्दल पुन्हा काय दावा केला?

ट्रम्प यांनी भारत रशियाकडून या वर्षाच्या अखेरपर्यंत हळूहळू तेल खरेदी बंद करणार असल्याचा आणि मोदींनी याची स्वत: खात्री दिली असल्याचा दावा केला आहे.

प्रश्न २. ट्रम्प यांनी रशियाच्या कोणत्या दोन कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत?

ट्रम्प यांनी रशियाच्या रोसनेफ्ट आणि लुकोइल या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

ट्रम्प यांनी पुतिन यांच्याविरुद्ध मोठी कारवाई! दोन प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर बंदी, भारतावर काय होईल परिणाम?

Web Title: Trump again claims india will stop buying russian oil by year end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

‘हिंमत असेल तर आमचा समाना करा’ ; दहशतवादी गट TTP च्या प्रमुखाचे असीम मुनीरला उघडपणे आव्हान
1

‘हिंमत असेल तर आमचा समाना करा’ ; दहशतवादी गट TTP च्या प्रमुखाचे असीम मुनीरला उघडपणे आव्हान

व्हेनेझुएलात भीषण दुर्घटनात! टेक ऑफनंतर काही क्षणातच विमान कोसळले आणि घडला स्फोट, VIDEO
2

व्हेनेझुएलात भीषण दुर्घटनात! टेक ऑफनंतर काही क्षणातच विमान कोसळले आणि घडला स्फोट, VIDEO

‘इस्रायल अमेरिकेचा गुलाम…’ , नेतन्याहूंच्या वक्तव्याने उडाली खळबळ; जाणून घ्या काय म्हणाले?
3

‘इस्रायल अमेरिकेचा गुलाम…’ , नेतन्याहूंच्या वक्तव्याने उडाली खळबळ; जाणून घ्या काय म्हणाले?

ट्रम्प यांनी पुतिन यांच्याविरुद्ध मोठी कारवाई! दोन प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर बंदी, भारतावर काय होईल परिणाम?
4

ट्रम्प यांनी पुतिन यांच्याविरुद्ध मोठी कारवाई! दोन प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर बंदी, भारतावर काय होईल परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.