Trump and Zelensky Meeting heated in debate again
Trump and Zelensky Meet : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रनेचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांच्या पुन्हा वाद उफाळला आहे. अमेरिकेच्या व्हाइट हाउसमध्ये दोन्ही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना रशियाच्या अटी मान्य करण्याची विनंती केली. यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु झाला. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. हे थांबवण्याच्या चर्चेसाठी झेलेन्स्की अमेरिकेला ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले होते.
Trump Tariff: ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यास…’ डोनाल्ड ट्रम्पची पुन्हा धमकी, काय होणार परिणाम
ट्रम्प आणि झेलेन्स्कीमध्ये वाद इतका वाढला की, दोघांमध्ये एकमेकांवर आरडा-ओरडा सुरु झाला. ट्रम्प यांनी झेलेन्स्कींच्या लष्करी योजना नाकारल्या. तसेच त्यांनी युक्रेनचा डोनबास प्रदेश रशियाच्या ताब्यात देण्यास सांगितले. याला झेलेन्स्कींनी नकार दिला आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला.
ट्रम्प यांनी बैठकीदरम्यान झेलेन्स्कींना व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) खूप शक्तिशाली आहे, आणि त्यांना हवे असल्यास क्षणात युक्रेनचा नाश करु शकतात. यामुळे युक्रेनचा विनाश थांबवायचा असले तर त्यांच्या अटी मान्य करा. ट्रम्प यांनी झेलेन्स्कींवर ओरडत युक्रेनियन सैन्याने नकाशे देखील फेकून दिले. आणि मी या लाल रेषांना कंटाळलो असल्याचे म्हटले.
परंतु झेलेन्स्कींनी रशियाचा युद्धविरामाचा हा प्रस्ताव नाकारला आहे. झेलेन्स्कींना डोनबास प्रदेश रशियाला सोपवण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. झेलेन्स्कींनी युक्रेन कोणत्याही परिस्थितीत त्यांचे सार्वभैमत्त्व आणि सीमा बदलणार नसल्याचे म्हटले आहे.
या बैठकीत युक्रेनचे प्रतिनिधी मंडळ देखील होते. या प्रतिनिधींनी ट्रम्प यांना रशियाविरुद्धच्या रणनीतीचे आराखडे समजवण्याचा प्रयत्व केला. परंतु ट्रम्प यांनी युक्रेनचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. त्यांनी पुन्हा पुन्हा रशियाच्या अटी मान्य करण्यावर जोर दिला. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी युक्रेनला लष्करी मदत थांबवण्याचीही धमकी दिली. मात्र झेलेन्स्की यांनी युक्रेन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले असे स्पष्ट केले.
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या हा पहिलाच वाद नाही, यापूर्वी देखील फेब्रुवारी २०२५ च्या अखेरीस दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. यावेळी देखील दोन्ही नेत्यांमध्ये व्हाइट हाउसमध्ये तीव्र वाद झाला होता. यावेळी झेलेन्स्की बैठकीतून उठून गेले होते.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. झेलेन्स्की आणि ट्रम्पमध्ये कशावरुन वाद झाला?
ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना युद्धबंदीसाठी रशियाच्या अटी मान्य करण्यास सांगितले, ज्याला त्यांनी स्पष्ट नकारा दिला. यामुळे ट्रम्प आणि झेलेन्स्कीमध्ये वाद झाला.
प्रश्न २. युद्ध संपवण्यासाठी काय आहेत रशियाच्या अटी?
युद्ध संपवण्यासाठी रशियाने युक्रेनच्या डोनबास प्रदेशाची मागणी केली आहे.