Colombia On US: 'जर तुमच्यात हिंमत असेल तर या, मी इथेच वाट पाहत आहे', आता 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांनीही ट्रम्प यांना दिले खुले आव्हान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Gustavo Petro vs Donald Trump 2026 : दक्षिण अमेरिकेतील राजकारण सध्या एका अत्यंत स्फोटक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता अमेरिकेचा पुढचा टार्गेट कोलंबिया असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो (Gustavo Petro) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना धडकी भरवणारा इशारा दिला आहे. “जर तुमच्यात हिंमत असेल तर या, मी इथेच तुमची वाट पाहत आहे,” अशा कडक शब्दांत पेट्रो यांनी ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला उत्तर दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एअर फोर्स वनवरून पत्रकारांशी बोलताना कोलंबियावर बोचरी टीका केली होती. ट्रम्प म्हणाले की, “कोलंबिया हा एका अशा आजारी नेत्याद्वारे चालवला जात आहे जो अमेरिकेला कोकेन पुरवतो.” इतकेच नाही तर, व्हेनेझुएलाप्रमाणे कोलंबियामध्येही लष्करी कारवाई करणे ही एक ‘चांगली कल्पना’ असू शकते, असे विधान करून ट्रम्प यांनी युद्धाचे संकेत दिले. ट्रम्प यांच्या या विधानामुळे कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Old Rock Day 2026: खडक नाही, तर पृथ्वीचा जिवंत इतिहास! 7 जानेवारी ‘ओल्ड रॉक डे’ निमित्त उलगडलं 4 अब्ज वर्षे जुन्या खडकांचं रहस्य
गुस्तावो पेट्रो हे स्वतः एकेकाळी ‘M-19’ या डाव्या विचारसरणीच्या गनिमी गटाचे सदस्य होते. १९८९ च्या शांतता करारावेळी त्यांनी शस्त्रे सोडण्याची शपथ घेतली होती. मात्र, ट्रम्प यांच्या धमकीनंतर त्यांनी सोशल मीडियावर (X) पोस्ट करत म्हटले की, “मी शांततेची शपथ घेतली होती, पण जर माझ्या देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लागला, तर मी माझ्या मातृभूमीसाठी पुन्हा एकदा शस्त्रे उचलेन.” पेट्रो यांनी इशारा दिला की जर अमेरिकेने हल्ला केला, तर इथली जनता ‘जॅग्वार’प्रमाणे आक्रमक होईल आणि अमेरिकन सैन्याला मोठ्या गनिमी काव्याला (Guerrilla Warfare) सामोरे जावे लागेल.
🚨 🇨🇴 🇺🇸 BREAKING: Gustavo Petro openly challenges Donald Trump, saying: “If you want to jail me, try and see if you can. If you want to put me in an orange uniform, try it. The Colombian people will take to the streets to defend me.”pic.twitter.com/XcCuyjG5ea — Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) January 4, 2026
credit : social media and Twitter
अमेरिका आणि कोलंबिया यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये अमेरिकेने पेट्रो आणि त्यांच्या कुटुंबावर ड्रग्ज तस्करीच्या आरोपावरून निर्बंध लादले होते. कोलंबिया हा जगातील सर्वात मोठा कोकेन उत्पादक देश असल्याने अमेरिका याकडे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहत आहे. मात्र, पेट्रो यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत ट्रम्प यांना ‘साम्राज्यवादी’ म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Hypnotism Day : श्रीकृष्णालाही अवगत होती ‘संमोहन’ कला; वाचा कास जागृत केलं जातं अवचेतन मनात लपलेल्या ‘या’ प्रचंड शक्तीला
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने एका गुप्त मोहिमेद्वारे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना त्यांच्याच घरातून उचलून न्यूयॉर्कमध्ये आणले. मादुरो यांनीही अटकेपूर्वी ट्रम्प यांना अशाच प्रकारे आव्हान दिले होते. आता पेट्रो यांनी दिलेले आव्हान पाहता, अमेरिका खरच कोलंबियामध्ये लष्करी हस्तक्षेप करणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कोलंबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत “आम्ही कोणत्याही धमकीला बळी पडणार नाही” असे स्पष्ट केले आहे.
Ans: ट्रम्प यांनी पेट्रो यांच्यावर कोकेन तस्करीचे आणि अमेरिकेला ड्रग्ज पुरवण्याचे आरोप केले आहेत, तर पेट्रो यांनी याला अमेरिकेचा साम्राज्यवाद आणि देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला म्हटले आहे.
Ans: पेट्रो हे माजी गनिमी योद्धा (Guerrilla) आहेत. अमेरिकेने लष्करी कारवाईची धमकी दिल्याने, त्यांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी पुन्हा सशस्त्र संघर्षात उतरण्याचा इशारा दिला आहे.
Ans: ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकन विशेष दलाने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली.






