
trump calls democrats biggest enemy us shutdown ice funding crisis 2026
US Government Shutdown 2026 Update : जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या (America) राजकारणात सध्या एकामागून एक धक्के बसत आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या छायेतून बाहेर पडत नाही तोच, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देशांतर्गत राजकारणात एक बॉम्ब टाकला आहे. आपल्या आवडत्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवरून त्यांनी चक्क आपल्याच देशातील दुसऱ्या मोठ्या राजकीय पक्षाला, म्हणजेच डेमोक्रॅटिक पक्षाला “अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू” ठरवले आहे. ट्रम्प यांच्या या विधानाने वॉशिंग्टनपासून ते न्यूयॉर्कपर्यंत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “इराणचे प्रकरण आता बाजूला ठेवा, आपला खरा शत्रू आपल्याच घरात आहे.” त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला ‘कट्टर डावे’ (Radical Left) आणि ‘अत्यंत अकार्यक्षम’ संबोधले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणसारखी बाह्य संकटे अमेरिका सहज झेलू शकते, पण देशातील अंतर्गत राजकीय गटबाजी आणि डेमोक्रॅट्सचे धोरण अमेरिकेला आतून पोखरत आहे. परराष्ट्र धोरणापेक्षा आता देशांतर्गत राजकारणावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mordechai Vanunu: इस्रायलची ‘न्यूक्लियर’ गुपितं जगाला विकणाऱ्या देशद्रोही वानुनूचा ‘मोसाद’ने ‘असा’ केला गेम; वाचा थरारक सत्य
ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकन सरकार ‘शटडाउन’च्या (Shutdown) संकटातून जात आहे. गेल्या महिनाभरापासून अनेक सरकारी विभागांना निधी मिळालेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असून सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या शटडाउनला ट्रम्प डेमोक्रॅट्सना जबाबदार धरत आहेत, तर डेमोक्रॅट्स ट्रम्प यांच्या हट्टी धोरणांमुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप करत आहेत. ही कोंडी फुटण्याऐवजी ट्रम्प यांच्या ताज्या विधानामुळे ती अधिकच बिकट झाली आहे.
NEW: President Trump rips into Democrats for the “chaos” they created with their purposeful DHS shutdown: “They are FULLY TO BLAME, and must pay a big price, for the good of our Country, in the Midterm Elections.” pic.twitter.com/RXHfkEP25f — Conservative War Machine (@WarMachineRR) March 18, 2026
credit – social media and Twitter
या संपूर्ण संघर्षाच्या मुळाशी आहे ते म्हणजे ‘इमिग्रेशन’ (स्थलांतर) धोरण. ट्रम्प यांना इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) या विभागासाठी मोठा निधी हवा आहे, जेणेकरून ते आपली कठोर स्थलांतर धोरणे राबवू शकतील. मात्र, डेमोक्रॅटिक खासदारांनी या निधी कपातीचा आग्रह धरला असून, ICE वर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. यामुळे दोन्ही पक्षांमधील दरी अधिक रुंदावली आहे. गृह सुरक्षा विभागाच्या निधीवरून सुरू असलेला हा वाद आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War III: युद्ध आर्क्टिकमध्ये! इराण USच्या शत्रूसोबत करणार हातमिळवणी; ‘या’ एका प्रस्तावाने ट्रम्पच्या स्वप्नांना लागणार ग्रहण
राजकीय तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय नसून ते समर्थकांना चिथावणी देणारे ठरू शकते. आपल्या विरोधकांना ‘देशाचे शत्रू’ संबोधल्यामुळे कट्टर समर्थकांमध्ये संतापाची लाट निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अमेरिकेत नागरी संघर्षासारखी (Civil War) परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांचा असलेला मोठा प्रभाव पाहता, हे विधान आगामी निवडणुकांपर्यंत वातावरण अधिक भडकवणारे ठरेल.
Ans: ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांना अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू संबोधले आहे.
Ans: सरकारी खर्चाचा निधी आणि स्थलांतर धोरणावरून (ICE Funding) रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्समध्ये एकमत न झाल्यामुळे महिनाभरापासून शटडाउन सुरू आहे.
Ans: अमेरिकेतील अंतर्गत राजकीय अस्थिरतेमुळे जागतिक शेअर बाजारात आणि डॉलरच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळू शकतात.