
काय आहे Autopen? ज्यामुळे अमेरिकन राजकारणात पेटला वाद; ‘या’ अध्यक्षांनी केला वापर, जाणून घ्या
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घोषणा केली आहे की, बायडेन प्रशासनाने ऑटोपेन मशीनने स्वाक्षरी केले आदेशांची मुदत आता संपली आहे. यामुळे आता याचा कायदेशीरित्या काही फायदा नाही. त्यांचे सर्व आदेश है आतापासून अवैध असतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी काही कागपत्रे कायदेशरित्या असुरक्षित असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
याशिवाय ट्रम्प यांनी बायडेन यांच्या मानसिक आरोग्यावरही टीका केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, बायडेन आता वृद्ध झाले असून त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही. म्हणून बायडेन यांचे त्यांच्या अध्यक्षपदावर पूर्ण नियंत्रण नव्हते अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या प्रशासनातील सदस्यांवर आरोप केला आहे की, बायडेन यांच्या अनुउपस्थित ऑटोपेनचा वापर करुन त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे.
जो बायडेन अध्यक्ष असताना, त्यांनी अनेक जवळचे सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांना माफ केले होते. यामध्ये ६ जानेवारीला वॉशिंग्टन येथे झालेल्या हल्ल्यात समावेश असणाऱ्या कॉंग्रसच्या सदस्यांचा, तसेच जनरल मार्क मिले, डॉ. अँथनी फौसी यांचा समावेश होता. तसेच त्यांनी कुटुंबामध्ये त्यांचे भाऊ जेम्स आणि फ्रॅंक, त्यांची बहिण व्हॅलेरी आणि त्यांच्या पत्नीलाही माफ केले होते. याशिवाय त्यांचा मुलगा हंटर यालाही माफ केले होते. मात्र ट्रम्प यांनी जो बायडेन यांचे सर्व माफीनामे रद्द केले असून हे सर्व लोक आता अडचणीत आले आहे.
ऑटोपेन एक रोबोटिक सिग्नेचर मशीन आहे. जी एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीची अचूक, हुबेहुब नक्कल करु शकते. राष्ट्रपती आणि उच्चपदीय अधिकारी याचा वापर करतात. विशेष करुन अमेरिकेत याचा मोठा वापर होतो. १८०३ मध्ये या मशीला पेटंट मिळाले होते. अमेरिकेच्या न्याय विभागाने २००५ मध्ये स्वाक्षरी करण्याऐवजी, ऑटोपेनच्या मदतीने बिलावर स्वाक्षरी केली जाऊ शकते. किंवा राष्ट्रपती नसल्यास इतर अधिकारी त्यांचा वापर करुन घोषणा करु शकतात.
Ans: ट्रम्प यांनी बायडेन यांच्या आरोग्यावर टीका करत त्यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा केला आहे.
Ans: जो बायडेन यांनी जवळचे सहकारी आणि कुटुंबातील काही सदस्यांना माफ केले होते.