Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump China Visit : ट्रम्प यांच्या चीन भेटीपूर्वीच ‘ड्रॅगन’चा अमेरिकेला सज्जड दम; तैवानसह ‘या’ मुद्द्यांवर चर्चेची दारे बंद

Trump China Visit : ट्रम्प १३ मे १५ मे चीनच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याचा उद्देश अमेरिका-चीनमधील व्यापार तणाव दूर करणे आहे. परंतु यापूर्वीच चीनने काही मुद्द्यांवर चर्चेस नकार दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 05:25 PM
Trump China Visit

Trump China Visit

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या चीन भेटीपूर्वीच ‘ड्रॅगन’चा स्पष्ट इशारा
  • तैवानसह ‘या’ मुद्द्यांवर चर्चेस ठाम नकार
  • जाणून घ्या
Trump China Visit News in Marathi : वॉशिंग्टन/बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) १३ मे ते १५ मे चीनच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच ट्रम्प चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांची भेट घेणार आहेत.सध्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यामुळे पश्चिम आशियाच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात अमेरिका-चीन व्यापार, इराण, तैवान यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, चीनने आक्रमक भूमिका घेत अमेरिकेसमोर रेड लाईन आखली आहे. यातील काही विषयांवर चर्चा होणार नसल्याचा स्पष्ट इशारा ड्रॅगनने दिला आहे.

Trump China Visit : इराणशी संघर्षाच्या सावटात ट्रम्प चीन दौऱ्यावर रवाना; जिनपिंग यांच्याशी ‘या’ जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा

चीनचा अमेरिकेला स्पष्ट इशारा

अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये संदेश दिला आहे की, अमेरिकेला द्विपक्षीय संबंध सुधारण्याची इच्छा असले, तर इतर मुद्द्यांपासून लांब रहावे. यामध्ये

  • तैवानचा प्रश्न : चीन (China) तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो आणि या मुद्द्यावर कोणत्याही बाह्य शक्तीचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असे चीनने म्हटले आहे.
  • लोकशाही आणि मानवाधिकार : याशिवाय चीनच्या अंतर्गत कार्यपद्धतीवर किंवा मानवाधिकारांच्या मुद्द्यांवर कोणतीही टीका, चर्चा मान्य नाही.
  • राजकीय व्यवस्था : चीनच्या कम्युनिस्ट राजवट आणि त्याच्या कार्यपद्धतीवर घाला घालण्याचा प्रयत्वन केल्यास संबंध बिघडू शकता, असे दूतावासाने म्हटले आहे.
  • विकासाचा अधिकार : याशिवाय चीनच्या तांत्रिक किंवा आर्थिक प्रगतीला रोखण्यासाठी अमेरिकेने कोणतेही पाऊल उचलल्या चीन सहन करणार नाही. हा चीनच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला मानला जाईल.

ट्रम्प यांचा अजेंडा

दुसरीकडे ट्रम्प यांनी चीनशी व्यापारी संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. चिनी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे ट्रम्प त्यांच्या शिष्टमंडळात अमेरिकेच्या दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क, टिम कुक, जेन्सेन हुआंद, लरी फिंक आणि स्टीफन स्वार्जमॅन यांसारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, चीनने अमेरिकेसाठी आपल्या बाजारपेठा खुला केल्या तर याचा दोन्ही देशांना चांगला फायदा होऊ शकतो.

इराण संकटाचे सावट

ट्रम्प यांचा हा दौरा अमेरिका (America) इराण संघर्षादरम्यान होत आहे. यावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु इराणच्या मुद्द्यावर कोणाच्याही मदतीची गरज नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर दौऱ्यापूर्वी त्यांनी इराणला योग्य निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.

सध्या हा दौरा जागतिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ही भेट जागतिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी की तणाव आणखी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान

Web Title: Trump china visit china warning to us over taiwan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
1

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’
2

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’

US Election Funding: अमेरिकन राजकारणात क्रिप्टो आणि AI कंपन्यांचा धुमाकूळ; निवडणुकीतील देणगीचे झाले सर्व रेकॉर्ड ब्रेक
3

US Election Funding: अमेरिकन राजकारणात क्रिप्टो आणि AI कंपन्यांचा धुमाकूळ; निवडणुकीतील देणगीचे झाले सर्व रेकॉर्ड ब्रेक

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.