चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Everest वर Drone War? चीन-अमेरिका संघर्षात नेपाळचा मोठा यू-टर्न, जगभरात खळबळ
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकरांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या माजी जो बायडेन (Joe Biden) सरकारवर टिका केली. त्यांनी म्हटले की, यापूर्वीच्या सरकारने चीनला अमेरिकेचा फायदा घेऊ दिला. मात्र, आम्ही ही चूक करणार नाही. आम्ही अतिशय विचारपूर्वीक चीनशी व्यापार करत आहोत असे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच त्यांनी दावा केला की, आम्ही चीनसोबत चांगले काम करत असून लवकरच दोन्ही देशांतील संबंधात सुधारणा होईल.
त्यांनी म्हटले की, बायडेन यांना धड बोलताही येत नसल्याने जिनपिंग यांना त्यांचा आदर नव्हता. पण ते माझा आदर करतात, मी त्यांचा आदर करतो, असे ट्रम्प यांनी म्हटले.
ट्रम्प यांच्या या दौऱ्यात तैवानचा मुद्दा सर्वात मोठ्या चर्चेचा विषय असेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग(XI Jinping) या मुद्द्यावर जास्त चर्चा करतील. पण अमेरिका (America) तैवानची सुरक्षा करण्यास सक्षम आहे, त्यांच्यावर कोणतेही संकट येणार नाही असे त्यांनी नमूद केले. तैवानला जपान आणि इतर प्रादेशिक देशांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले.
याच वेळी पश्चिम आशियातील इराणसोबत वाढता तणाव आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) च्या सुरक्षेबाबातही ट्रम्प यांनी मोठे विधान केले. त्यांनी मते, चीन गरजेच्या ४०% तेल होर्मुझमधून निर्यात करतो. यामुळे चीनलाही या भागात शांतता हवी आहे. येत्या बैठकीत इराण आणि जागतिक उर्जा पुरवठा हे मुद्देही चर्चेच्या केंद्रस्थानी असतील असे ट्रम्प यांनी सांगितले.
सध्या ट्रम्प यांच्या चीन (China) दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्यांचा हा दौरा केवाळ अमेरिका-चीन व्यापार संबंध सुधारण्यासाठी नाही, तर जागतिक राजकारणात पुन्हा अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा याचा हेतू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Ans: अमेरिका-चीन व्यापार संबंध सुधारणे, विशेष करुन उर्जा सुरक्षा, इराण संघर्ष आणि तैवान या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी चीनचा दौरा करणार आहेत.
Ans: ट्रम्प यांच्या मते, अमेरिका तैवानचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, यामुळे तैवानवर कोणतेही संकट येणार नाही. तैवानला इतरही देशांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले.






