Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पसोबत हे काय घडलं? भारताऐवजी इराणचे नाव घेत केले विचित्र दावे; VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Donald Trump Viral Video: डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेचा विषय बनत असतात. कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या निर्णयांमुळे त्यांची चर्चा सुरुच असते. सध्या ते पुन्हा चर्चेत आले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 16, 2025 | 08:34 PM
trump confuses india with iran

trump confuses india with iran

Follow Us
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प पुन्हा चर्चेत
  • भारताऐवजी इराणचे नाव घेत केले युद्धबंदीचे दावे
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Donald Trump Viral Video : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांनी दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. अनेक देशांसोबत त्यांनी वैर साधले आहे. अगदी भारतासारख्या मित्र देशाबाबतही त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी अनेक वेळा भारतावर निशाणा साधत मोठे दावे केले आहे. पण यावेळी मात्र ट्रम्प शब्दांमध्ये असे कन्फ्यूज झाले की, त्यांनी भारताऐवजी इराणचे नाव घेत विचित्र गोष्टी बोलल्या आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक त्यांना ट्रोल करत आहेत.

पाकिस्तानची ‘चाटुगिरी’ कमी होणार नाही; ट्रम्पला नोबेल देण्याची शाहबाज शरीफची मागणी, मेलोनींची रिअ‍ॅक्शन व्हायरल

सर्वांना माहितच असेल की ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय स्वत:ला देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. पण ट्रम्प काही ऐकण्याचे नाव घेईनात. मात्र यावेळी ट्रम्प यांना भारत पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेणं चांगलंच महागात पडलं आहे. ट्रम्प यांनी नुकतेच भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचा दावा केला होता.

व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांना हा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याच्या दरम्यानच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प भारताला इराणशी गोंधळात टाकत आहे. ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धबंदीऐवजी, इराण पाकिस्तान युद्धबंदी असे व्हिडिओत म्हटले आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

BREAKING: In an insane moment, Trump calls Iran a nuclear power, and claims to have stopped a war between Pakistan and Iran. “I heard they are shooting at each other. Two nuclear powers,” confusing Iran with India. His cognitive ability is GONE.pic.twitter.com/IHChAZrny3 — Really American 🇺🇸 (@ReallyAmerican1) October 15, 2025

नेमकं व्हिडिओत काय म्हणाले ट्रम्प?

व्हाइट हाइसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. यावेळी त्यांनी म्हटले की, पाकिस्तान आणि इराण अणुशक्ती देश आहेत. मला कळाले की, ते एकमेकांवर हल्ला करत आहेत. त्यानंतर मी दोघांना सांगितले की, त्यांनी युद्ध संपवले नाही तर त्यांच्यावर २००% कर लादला जाईल आणि अमेरिका त्यांच्यासोबत कोणताही व्यापार करणार नाही. यामुळे हे युद्ध २४ तासांत थांबले. नाहीतर अणुयुद्धाचा धोका अटळ होता.

तसे तर ट्रम्प यांनी हा दावा भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत केला होता, पण व्हिडिओमध्ये भारताऐवजी इराण म्हटले असल्याचे दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडिओवर ट्रोलिंग करत खिल्ली उडवणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने सत्तरी मध्ये असे होतेच, असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने मला खात्री आहे, ते त्यांच्या वक्तव्यावर स्वत:च हासत असतील असे म्हटले आहे. आणखी काहींनी काल्पनिक युद्धे थांबवणे खूपच सोपे आहे, म्हणूनच कदाचित त्यांना नोबेल मिळाला नसेल असे म्हटले आहे. याशिवाय वेगवेगळे मिम्सही शेअर केले आहेत.

‘ट्रम्प एक लोभी…’ ; अमेरिकेच्या माजी राजदूताची भारत-अमेरिका संबंधावरुन राष्ट्राध्यक्षांवर जोरदार टीका

Web Title: Trump confuses india with iran video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • Donald Trump
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

Sindh Division : पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे विभाजन होणार? लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या योजनेवर भडकले बिलावल भुट्टो-झरदारी
1

Sindh Division : पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे विभाजन होणार? लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या योजनेवर भडकले बिलावल भुट्टो-झरदारी

UK Israel Sanctions: वेस्ट बँक वादात इस्रायल आक्रमक! ब्रिटनविरोधात घेतले 4 मोठे कठोर निर्णय; राजनैतिक वर्तुळात खळबळ
2

UK Israel Sanctions: वेस्ट बँक वादात इस्रायल आक्रमक! ब्रिटनविरोधात घेतले 4 मोठे कठोर निर्णय; राजनैतिक वर्तुळात खळबळ

India-SriLanka: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली श्रीलंकेच्या राष्ट्रपतींची भेट; सागरी सुरक्षेवर झाली महत्त्वपूर्ण चर्चा
3

India-SriLanka: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली श्रीलंकेच्या राष्ट्रपतींची भेट; सागरी सुरक्षेवर झाली महत्त्वपूर्ण चर्चा

Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य
4

Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.