'ट्रम्प एक लोभी...' ; अमेरिकेच्या माजी राजदूताची भारत-अमेरिका संबंधावरुन राष्ट्राध्यक्षांवर जोरदार टीका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Rahm Emanuel on India-US Relations : वॉशिंग्टन : गेल्या काही काळात रशियाकडून तेल खरेदीवरुन भारत आणि अमेरिका (America) संबंधात तणाव निर्माण झाले आहे. यावर अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी टीका केली आहे. अनेकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताशी संबंध सुधारण्याचा सल्ला दिला आहे. नुकतेच आणखी एका माजी अमेरिकन अधिकाऱ्याने ट्रम्पवर टीका केली आहे.
जपानमधील माजी अमेरिकन राजदूत आणि माजी अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांचे चीफ ऑफ स्टाफ रहम इमॅन्युएल यांनी ट्रम्पवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्रम्पवर गंभीर आरोप करत, ट्रम्प यांच्या वैयक्तिक हितसंबंधामुळे भारत अमेरिका संबंध बिघडले असल्याचा दावा केला आहे. रहम इमॅन्युएल यांनी ट्रम्प हे सर्व पाकिस्तानकडून मिळालेल्या पैशांच्या बदल्यात करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुरुवारी इमॅन्युएल यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अहंकार आणि लोभामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. त्यांच्यामुळे दोन्ही देशांत विश्वास आणि धोरणात्मक भागीदारी नष्ट झाली आहे. रहम इमॅन्युएल यांनी मेक द अमेरिका ग्रेट चा उल्लेख करत ट्रम्प यांची धोरणे याच्या पूर्णविरोधात असल्याचा आरोप केला आहे.
रहम इमॅन्युएल यांनी ट्रम्प यांना लोभी आणि अहंकारी म्हणत, त्यांनी पाकिस्तनकडून मिळालेल्या पैशांमुळे आणि वैयक्तिक हितसंबंधामुळे भारताशी असलेले संबंध खराब झाल्याचे म्हटले. तसेच त्यांनी चीनच्या तुलनेत भारत अमेरिकेचा उत्पादन, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात एक मजबूत भागीदार बनला असता असेही स्पष्ट केले. पण ट्रम्पमुळे अमेरिकेचे ४० वर्षांचे धोरणात्मक कष्टांवर पाणी फेरले असल्याचे त्यांनी म्हटले.
🚨 Former US Ambassador to Japan EXPOSES Donald Trump “President Trump has thrown away the relationship with India because of his EGO and some MONEY from Pakistan that was PAID to his SON.” pic.twitter.com/ub2FPdx4Ch — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) October 15, 2025
गेल्या काही महिन्यात भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहे. पण डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या विधानावरुन यामध्ये तणाव वाढवत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेण्यापासून ते रशियाकडून तेल खरेदीवरुन भारतावरील अतिरिक्त टॅरिफवरुन ट्रम्प यांनी भारतविरोधी भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय सततच्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी भेटवरुन भारतापेक्षा ट्रम्प पाकिस्तानशी जवळचे संबंध दाखवत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
प्रश्न १. भारत-अमेरिका संबंधावरुन डोनाल्ड ट्रम्पवर कोणी टीका केली?
जपानमधील माजी अमेरिकन राजदूत आणि माजी अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांचे चीफ ऑफ स्टाफ रहम इमॅन्युएल यांनी भारत-अमेरिका संबंधावरुन डोनाल्ड ट्रम्पवर टीका केली आहे.
प्रश्न २. रहम इमॅन्युएल यांनी डोनाल्ड ट्रम्पवर काय आरोप केले?
रहम इमॅन्युएल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या लोभीपणामूळे आणि अहंकारामुळे भारताशी असलेले संंबंध बिघडवल्याचा आरोप केला आहे.
Pak-Afghan War : पाकिस्तानी सैन्य पॅन्ट सोडून गेले पळून ; अफगाणी सैन्यानी भरचौकात केला जल्लोष