डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याच्या शेहबाज शरीफ यांच्या मागणीवर जॉर्जिया मेलोनी यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली (फोटो - सोशल मीडिया)
इजिप्तमध्ये शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी 20 देशांचे नेते उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविण्यासाठीही चांगले योगदान दिले. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता. आम्ही पुन्हा एकदा त्यांना नोबेल मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवू.” असे म्हणच शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्काराच्या इच्छा पुन्हा एकदा जाग्या केल्या आहेत. त्याचबरोबर भारत-पाक युद्धपरिस्थिती आणण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न केले असल्याचे देखील शाहबाज शरीफ यांनी अधोरेखित केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शाहबाज शरीफ हे भाषण करत असताना त्यांच्या शेजारी डोनाल्ड ट्रम्प उभे होते. तर मागे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी उभ्या होत्या. शहबाज यांचे वाक्य ऐकताच मेलोनी यांनी दिलेली रिअॅक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करणार असल्याचे शहबाज म्हणताच मेलोनी यांनी तोंडावर हात ठेवला. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील बदलले.
आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारत आणि पाकिस्तानमध्ये मे महिन्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पहलगाममध्ये भारतीय 26 पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. याला उत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर केले. यानंतर भारत-पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकमध्ये युद्धबंदी केल्याचे ट्वीट करत दावा केला. अनेकदा भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र पाकिस्तान सवयीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागेपुढे करत युद्धबंदीचे श्रेय ट्रम्पला दिले. पुढे शरीफ म्हणाले की, आज आम्ही पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्पला नोबेल पुरस्कार देण्यासाठी नाव सुचवत आहोत. कारण आम्हाला खरंच वाटतं की ते या पुरस्कारासाठी योग्य दावेदार आहेत. त्यांनी केवळ दक्षिण आशियामध्ये शांतता राबवली असे नाही तर लाखो लोकांचे आयुष्य वाचवले. आज गाझा करार करत लाखो लोकांचे प्राण वाचवले, अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा कौतुक सोहळा रंगवला.






