Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Modi : ‘भारतावर टॅरिफ लावा…’, इकडे पंतप्रधान मोदींना खास मित्र म्हणून ट्रम्पने G-7 देशांना भारताविरुद्ध भडकवले

US Meeting with G7: कॅनडाच्या अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नवीन निर्बंध आणि जप्त केलेल्या रशियन मालमत्तेच्या संभाव्य वापरावरही चर्चा झाली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 13, 2025 | 11:50 AM
Trump hails Modi as a special friend but US pushes G7 to tax India China over Russian oil

Trump hails Modi as a special friend but US pushes G7 to tax India China over Russian oil

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेने G-7 देशांना भारत आणि चीनवर मोठे कर लादण्याचे आवाहन केले.

  • ट्रम्प पंतप्रधान मोदींना “खास मित्र” म्हणत असतानाच, अमेरिकन अर्थमंत्र्यांनी भारत-चीनला रशियाचे प्रमुख सहयोगी ठरवले.

  • जप्त रशियन मालमत्तेच्या वापरावर आणि नवीन निर्बंधांवर G-7 देशांमध्ये चर्चा झाली.

Trump Modi relationship : एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदींना सतत “खास मित्र” म्हणतात, पण दुसरीकडे अमेरिकन प्रशासन भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. G-7 देशांच्या अलीकडील व्हर्च्युअल बैठकीत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट आणि व्यापार प्रतिनिधी जेमसन ग्रीर यांनी सदस्य देशांना स्पष्ट शब्दांत सांगितले की भारत आणि चीन या दोन्ही देशांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करणे थांबवले पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कठोर टॅरिफ म्हणजेच कर लादावा. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे मोदी-ट्रम्पच्या “मैत्री”तला विरोधाभास प्रकर्षाने पुढे आला आहे. एका बाजूला मित्रत्वाचे दावे आणि दुसऱ्या बाजूला दबाव तंत्र या दोन्ही गोष्टी जागतिक राजकारणातील गुंतागुंतीचे चित्र अधोरेखित करतात.

रशियाविरोधी निर्बंधांचा नवा टप्पा

कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत रशियावरील नवीन निर्बंध, व्यापार मर्यादा आणि जप्त केलेल्या रशियन मालमत्तेच्या वापरावर विस्तृत चर्चा झाली. कॅनडाने स्पष्ट केले की, युक्रेनच्या दीर्घकालीन आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी आणि मॉस्कोवर दबाव वाढवण्यासाठी G-7 देशांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. या चर्चेत विशेषत: एकच मुद्दा वारंवार अधोरेखित करण्यात आला  रशियाच्या ऊर्जा निर्यातीवर परिणाम न झाल्यास युक्रेनमधील युद्ध संपणार नाही. त्यामुळे भारत-चीनसारख्या देशांनी रशियन तेल खरेदी थांबवणे, अथवा त्यांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात कर लादणे हा प्रभावी मार्ग ठरू शकतो, असा अमेरिकेचा युक्तिवाद होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India UN Vote : पॅलेस्टाईन हा वेगळा देश असावा… भारताने संयुक्त राष्ट्रात केले मतदान, पाहा किती देशांनी दिला पाठिंबा?

अमेरिका काय म्हणते?

बैठकीनंतरच्या संयुक्त निवेदनात बेसंट आणि ग्रीर यांनी म्हटले “पुतिनच्या युद्धयंत्रणेला आर्थिक आधार देणारे महसूल केवळ एकत्रित प्रयत्नानेच रोखता येतील. जर जगाने पुरेसा आर्थिक दबाव आणला, तर हे निरर्थक हत्याकांड थांबवता येईल.” अमेरिकेने थेट इशारा दिला की रशियन तेलाची आयात करणारे भारत व चीन हे पुतिनच्या युद्धयंत्रणेला अप्रत्यक्ष निधी पुरवत आहेत. त्यामुळे युद्ध चालू ठेवण्यात या दोन्ही देशांचा मोठा हात आहे.

Two weaks.

The US is pushing G-7 allies to impose tariffs of up to 100% on China and India over their purchases of Russian oil, aiming to pressure Putin to end the war. Trump said his patience with Moscow is “running out fast,” warning of heavy sanctions targeting banks, oil and… pic.twitter.com/OsevaJxARA

— NOELREPORTS 🇪🇺 🇺🇦 (@NOELreports) September 12, 2025

credit : social media

कर कधी हटवले जातील?

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, भारत-चीनवरील हे कर कायमस्वरूपी नसतील. युद्ध संपल्यानंतर आणि रशियन उर्जेवरील अवलंबित्व कमी झाल्यानंतर हे शुल्क हटवले जाऊ शकते. परंतु तोपर्यंत, अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र कठोर धोरणावर ठाम राहतील.

भारताची अडचण वाढणार का?

भारताकडून सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केल्यामुळे देशाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. मात्र, अमेरिकेच्या या नव्या दबावामुळे भारतासमोर मोठे धोरणात्मक आव्हान निर्माण झाले आहे. एका बाजूला ऊर्जा सुरक्षेची गरज आणि दुसऱ्या बाजूला पश्चिमी मित्र राष्ट्रांचे संबंध – या द्वंद्वात भारताला पुढे कोणता मार्ग निवडायचा हा मोठा प्रश्न आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Chocolate Day 2025 : तणाव कमी करण्यापासून हृदय निरोगी ठेवण्यापर्यंतचे ‘असे’ आहेत चॉकलेटचे फायदे

पंतप्रधान मोदींना ‘खास मित्र’ म्हटले

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना “खास मित्र” म्हटले असले तरी, अमेरिकन प्रशासनाची अधिकृत भूमिका मात्र पूर्णपणे भिन्न आहे. G-7 देशांच्या चर्चेतून हे स्पष्ट झाले की, भारत आणि चीनवर दबाव आणण्यासाठी पुढील काही दिवसांत मोठे कर आणि निर्बंध लागू होऊ शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका अधिक क्लिष्ट होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Trump hails modi as a special friend but us pushes g7 to tax india china over russian oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • International Political news
  • PM Narendra Modi
  • Russia
  • Tarrif
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच मणिपूर पेटले; अनेक ठिकाणचे पोस्टर्स बॅनरही फाडले
1

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच मणिपूर पेटले; अनेक ठिकाणचे पोस्टर्स बॅनरही फाडले

एक डास मारणं चोराला पडलं भारी…! रक्ताच्या नमुन्याने थेट उघड केली चोरी
2

एक डास मारणं चोराला पडलं भारी…! रक्ताच्या नमुन्याने थेट उघड केली चोरी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा २१ वा हप्ता लवकरच, कधी मिळू शकतात पैसे?
3

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा २१ वा हप्ता लवकरच, कधी मिळू शकतात पैसे?

Gyan Bharatam Portal Launch: प्राचीन भारतीय ज्ञान आता एका क्लिकवर; पंतप्रधान मोदींनी ‘ज्ञान भारतम्’ पोर्टल केले लाँच
4

Gyan Bharatam Portal Launch: प्राचीन भारतीय ज्ञान आता एका क्लिकवर; पंतप्रधान मोदींनी ‘ज्ञान भारतम्’ पोर्टल केले लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.