International Chocolate Day : चॉकलेट केवळ चविष्टच नाही तर आरोग्याचा खजिना देखील आहे, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि फायदे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
International Chocolate Day 2025 : दरवर्षी १३ सप्टेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस केवळ चविष्ट पदार्थाची आठवण करून देणारा नाही, तर त्याच्या इतिहासाशी आणि आरोग्यदायी गुणधर्मांशीही जोडलेला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या मोठ्या चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन एस. हर्शी यांचा जन्मदिवसही हाच आहे. त्यांनी सामान्य लोकांपर्यंत चॉकलेट परवडणाऱ्या किमतीत पोहोचवले आणि म्हणूनच आजही या दिवशी लोक चॉकलेट खाऊन त्यांना आठवतात.
चॉकलेटचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. अंदाजे २५०० वर्षांपूर्वी मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये प्रथमच कोको झाडाची लागवड झाली. कोकोच्या झाडाला “थिओब्रोमा कोकाओ” (Theobroma Cacao) असे नाव आहे, ज्याचा अर्थ आहे “देवतांचे अन्न”. त्या काळात चॉकलेट हे गोड पदार्थ नव्हते, तर एक प्रकारचे कडवट पेय होते. नंतर १६व्या शतकात युरोपियन वसाहतवाद्यांनी त्यात दूध आणि साखर घालून त्याला गोड स्वरूप दिले. हळूहळू ते “चॉकलेट” या नावाने जगभर लोकप्रिय झाले. आज ते मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे आवडते खाद्यपदार्थ झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Political Unrest : जागतिक राजकारण हे बुद्धिबळासारखे; नेपाळमधील बदलाने चीनला धक्का पण अमेरिकेला सर्वात जास्त फायदा
तज्ज्ञांच्या मते, चॉकलेटचे अनेक प्रकार आहेत, परंतु डार्क चॉकलेट सर्वाधिक फायदेशीर मानले जाते. कारण त्यात साखरेचे प्रमाण कमी आणि पोषक घटक जास्त असतात.
अशा प्रकारे डार्क चॉकलेट केवळ चवीपुरते मर्यादित नाही तर ते मन आणि शरीर या दोन्हींसाठी उपयुक्त आहे.
“अति तिथे माती” हे वाक्य चॉकलेटसाठीही लागू होते. योग्य प्रमाणात खाल्ले तर फायदे, परंतु जास्त खाल्ले तर त्रासदायक ठरते.
म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, चॉकलेट आवडत असले तरी ते मर्यादित प्रमाणातच खावे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Revenge : जॉर्डन-सीरियापासून इराकपर्यंत… युद्धात विश्वासघात करणाऱ्या देशांवर इराण ‘असा’ घेतोय सूड
आजच्या या आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिनी, आपण केवळ त्याची गोड चव साजरी करत नाही तर त्याचा इतिहास, आरोग्यदायी गुणधर्म आणि तोटेही लक्षात ठेवले पाहिजेत. चॉकलेट आनंद देते, ऊर्जा देते, पण त्याचा अतिरेक टाळणे गरजेचे आहे. म्हणूनच, आजच्या दिवशी एक तुकडा डार्क चॉकलेट खाऊन त्याची खरी मजा घेणे हीच योग्य पद्धत ठरेल.






