
Trump hints tariff cuts in fair trade deal with India
Donald Trump on India Tarrif News : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावरील कर (Tarrif) कमी करण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हा कर लादला होता. तसेच त्यांनी भारतासोबत व्यापार कराराचे देखील संकेत दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर रवाना; भारतासाठी खास मानली जात आहे भेट, का?
ट्रम्प यांनी म्हटले की, भारतातील लोक माझ्यावर नाराज आहे, पण मला खात्री आहे की ते पुन्हा मला प्रेम देतील. पुन्हा एकदा भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले होतील. ट्रम्प यांनी असाही दावा केला की, अमेरिका आणि भारतातील व्यापार करार चर्चा निष्पक्ष होत असून कराराच्या अंतिम टप्प्यात आहोत.ट्रम्प यांनी पुढील काही दिवसात भारतावरी उच्च कर कमी होण्याचे स्पष्ट संकेत दिल आहेत.
तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या संबंधावरही भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदींशी असलेल्या संबंधावर ट्रम्प म्हणाल की, पंतप्रधान मोदींसोबत संबंध चांगले आहेत. भारतातील राजदूत सर्जियो यांनी हे आणखी मजबूत केले आहे. तसेच त्यांचीशी मैत्रीपूर्ण संबंध अजूनही आबेत. त्यांनी सांगितले की, राजदूत सर्जियो दोन्ही देशाचे संबंध मजबूत करण्यासाठी, उद्योग आणि तंत्रज्ञान गुंतवणूक वाढवण्यासाठी, ऊर्जा निर्यातीसाठी आणि दोन्ही देशातील सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी कामकाज पाहतील.
VIDEO | Washington: Responding to a question during a press conference at White House, US President Donald Trump (@POTUS) said: “Tariffs high on India because of Russian oil; they’ve reduced Russian oil substantially, at some point will bring tariffs down.” (Source: Third Party)… pic.twitter.com/UhjGRqPKxa — Press Trust of India (@PTI_News) November 11, 2025
भारतावर का लादण्यात आला होता कर?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातील जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादला होता. यावेळी ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लागू केला होता. त्यांच्या मते, भारता हा अमेरिकेवर सर्वाधिक कर लादणार देश आहे. याच दरम्यान रशिया आणि युक्रेन युद्ध तीव्र झाले होते. यामुळे ट्रम्प यांनी भारतावर युद्धात रशियाला मदत केल्याचा आरोप करत भारतावर आणखी २५% कर लादला.
ट्रम्प यांनी भारतावर आरोप केला की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे त्याला युक्रेनविरुद्धच्या युद्धात आर्थिक निधी मिळत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची मागणी ट्रम्प यांनी केली होती. पण भारताने याला नकार दिला होता. भारताने स्पष्ट केले की, रशियाकडून तेल खरेदी केवळ राष्ट्रीहितासाठी आणि जागतिक स्थैर्यासाठी आहे. परंतु यानंतर भारत आणि अमेरिकेत तणाव अधिक वाढत गेला होता.
सध्या ट्रम्पकडून भारतावरील कर कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत, परंतु अद्यापही याबाबत अनिश्चितता कायम आहे. ट्रम्प यांच्या या विधानावर भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Delhi Red Fort Blast : दिल्ली धमाक्यानंतर पाकिस्तान हाय अलर्टवर; राजस्थान सीमेजवळ…
Ans: अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर २५% टक्के कर आणि २५ टक्के अतिरिक्त दंडही लागू केला आहे. यामुळे एकूण ५०% कर भारतावर आहे,
Ans: रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्यामुळे भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के कर लादला आहे.
Ans: ट्रम्प यांनी भारतावरील कर कमी होण्याचे आणि व्यापार करार अगदी जवळ असल्याचे संकेत दिले आहेत.