पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर रवाना; भारतासाठी खास मानली जात आहे भेट, का? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
PM Modi Bhutan Visit : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर रजाणार आहेत. दोन्ही देशांतील दृढ मैत्रीच्या दृष्टीकोनातून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ११ वर्षात चौथ्यांदा पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.यादरम्यान दोन्ही देशांतील संबंध अधिक बळकट होतील.
Delhi Red Fort Blast : दिल्ली धमाक्यानंतर पाकिस्तान हाय अलर्टवर; राजस्थान सीमेजवळ…
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्या वांगचुक यांच्यासोबत १,०२० मेगावॅट पुनात्संगचु-२ जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. हा प्रकल्प ऊर्जा सहकार्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही देशांच्या विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे. तसेच ग्लोबल प्रीस प्रेयर फेस्टिव्हल मध्ये देखील ते सहभागी होती. हा प्रोग्राम जगभरात शांतता स्थापित करणे आणि मानवतेच्या कल्ल्यासाठी संयुक्तपण प्रयत्न करण्याचा उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या ऊर्जा संबंधांना देखील नवी दिशा मिळणार आहे.
याशिवाय पंतप्रधान मोदी भूतानचे पंतप्रधान त्सेरिंग टोबगे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत ऊर्जा, व्यापार, सुरक्षा, शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, हा दौरा भारत आणि भूतानच्या भागीदारीला अधिक मजबूत आणि नवी दिशा देईल.दोन्ही देशांचे संबंध विश्वास. सद्भावना आणि आदरावर आधारित आहेत.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi departs for Thimphu, Bhutan. The PM is paying a State visit to Bhutan from 11-12 November 2025. During the visit, PM Modi will also participate in the Global Peace Prayer Festival organised by the Royal Government of Bhutan. (Video:… pic.twitter.com/7h3st1NgYS — ANI (@ANI) November 11, 2025
याशिवाय पंतप्रधान मोदी भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७० व्या जन्मसोहळ्यासाठी देखील उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा भूतानसाठी ऐतिहासिक मानला जात आहे. शिवाय भारताच्या उपस्थितीमुळे याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. आता भूतानमध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र पिपरहवाच्या अवशेषांचे प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शन देखील पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. हे दोन्ही देशामधील सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संबंधाचे प्रतीक मानते जात आहे. यामुळे ही भेट भारतासाठी अत्यंत खास मानली जात आहे.
बांगलादेशमध्ये शिजतोय भारताविरोधात कट; दहशतवादी हाफिज सईदच्या कुरघोड्या सुरुच






