Delhi Red Fort Blast : दिल्ली धमाक्यानंतर पाकिस्तान हाय अलर्टवर; राजस्थान सीमेजवळ...
Delhi Bomb Blast News in Marathi : नवी दिल्ली : काल (१० नोव्हेंबर) राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ एक हादरवणारी घटना घडली.लाल किल्ल्याजवळी मेट्रो स्टेशमन परिसरात एक भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या धमाक्यानंतर केवळ भारतच नव्हे, तर शेजारी देशांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशमध्ये देखील खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेजवळ हवाई क्षेत्रात संरक्षण वाढवले आहे. तसेच पाकिस्तानने पंजाबमधील भारत-पाक सीमेवर देखील हाय अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्कर, नौदल, आणि हवाई दलांच्या प्रमुखांसह बैठक घेतली. या बैठकीत भारतातील स्फोटाचा आढावा घेतला आहे.
नेपाळ, बांग्लादेश देखील हाय अलर्टवर आहे. उत्तर प्रदेश-नेपाळ सीमांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. बांगलादेशने देखील आंतरराष्ट्रीय सीमांवर सुरक्षा वाढवली आहे. याच वेळी ब्रिटनने देखील भारतातील आपल्या नागरिकांसाठी इशारा दिला आहे. भारतातील काही भागांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष करुन भारत-पाकिस्तान सीमेजवळ १० किमी पर्यंत, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर राज्यांमध्ये प्रवास टाळण्यास सांगितले आहे. अमेरिका आणि फ्रान्सच्या दूतावासाने देखील आपल्या नागरिकांसाठी दिल्लीतील लाल किल्ला परिसरा व गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
दिल्ली स्फोटाचे कारण सध्या अस्पष्ट आहे. या घटनेचा संबंध दहशतवाद्यांशी जोडला जात आहे. फरीदाबाद येथून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर देशाच्या मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आली आहे. सर्वत्र कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबद्दल दुःख व्यक्त केले आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली. घेतला.” तसेच NIA आणि NSG च्या टीम्स घटनास्थळी तपासासाठी पोहोचल्या आहेत.
Delhi Bomb Blast: आयुषात असा धमाका पाहिला नाही…; प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयाण अनुभव






