
Trump India-Pakistan were near nuclear clash but my tariff threat stopped it
Trump India-Pakistan nuclear clash : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारत–पाकिस्तानमधील ( India-Pakistan war) संभाव्य युद्ध थांबवण्याचे श्रेय स्वतःकडे घेतले आहे. पूर्वीही त्यांनी असे दावे केले होते, परंतु या वेळी त्यांनी एक नवा, धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाद निर्माण करणारा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्याप्रमाणे, भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या तयारीत होते आणि त्यांनी दोन्ही देशांना ३५० टक्के ( 350% )कर तसेच पूर्ण व्यापार नाकेबंदीची कठोर धमकी दिल्यानंतरच परिस्थिती शांत झाली. ट्रम्प बुधवारी (१९ नोव्हेंबर २०२५) अमेरिका-सौदी गुंतवणूक मंचात बोलत होते. या भाषणात त्यांनी स्वतःच्या ‘कूटनीतिक क्षमतेचा’ उल्लेख करताना म्हटले, “मी अनेक वर्षांपासून वाद सोडवण्यात सर्वात उत्तम काम केले आहे. मला समस्यांचे निराकरण कसे करायचे ते चांगले माहीत आहे.”
आपल्या भाषणाच्या एका टप्प्यावर ट्रम्प यांनी असा गंभीर दावा केला की, भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर अणुहल्ला करण्याच्या तयारीत होते. ते म्हणाले,
“मी दोन्ही देशांना सांगितले ठीक आहे, तुम्ही युद्ध करणार असाल तर करा, पण मग अमेरिका दोन्ही देशांवर ३५०% कर लादेल आणि भविष्यात तुमच्याशी कोणताही व्यापार करणार नाही.”
ट्रम्प यांच्या मते, ही धमकी ऐकल्यानंतर दोन्ही देशांची प्रतिक्रिया एकच होती, “नाही, नाही, तुम्ही असे करू नका.”
यावर ट्रम्प म्हणाले,
“मी त्यांना स्पष्ट सांगितले की मला फरक पडत नाही तुम्हाला आवडते की नाही. मी लाखो लोक मरू देणार नाही, अणुधूर लॉस एंजेलिसपर्यंत जाऊ देणार नाही.”
या संपूर्ण घटनेला अधिक नाट्यमय बनवत त्यांनी असा दावा केला की, या हस्तक्षेपानेच दोन अणुशक्तींमधील संघर्ष शांत झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files : Donald Trump मुळे अखेर अमेरिकेची गुपिते जगासमोर उघड होणार; ‘हे’ गुप्त दस्तऐवज 30 दिवसांत सार्वजनिक करणार
ट्रम्प यांनी सांगितले की पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी युद्ध थांबवल्यानंतर त्यांना फोन केला आणि म्हटले की,
“तुम्ही लाखो लोकांचे जीव वाचवले. तुम्ही या लोकांना ओळखतही नाही, तरीही तुम्ही त्यांच्यासाठी हे केले.”
हा दावा सत्य आहे की राजकीय नाट्य? याबाबत मात्र अमेरिकेत व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे.
ही परिस्थिती मे महिन्यात सुरु झाली. एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन ‘सिंदूर’ हाती घेतले. या कारवाईत एकूण नऊ दहशतवादी तळांचा पूर्ण नाश करण्यात आला. या कारवाईमुळे पाकिस्तान पूर्णपणे अस्थिर झाला आणि प्रतिउत्तर म्हणून अनेक भारतीय लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. दोन्ही देशांमध्ये सलग काही दिवस क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ले सुरु राहिले. तणाव इतका वाढला की जागतिक समुदायाने हस्तक्षेप करण्याची गरज भासली. शेवटी १० मे रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Terror Links : ‘ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद…’भारताविरुद्ध अतांकिस्तानचा धोकादायक कट; बांगलादेशी पंतप्रधान युनूसला बनवले ‘मोहरा’
ट्रम्प यांचा हा दावा कितपत खरा आहे याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न निर्माण होत आहेत. भारत आणि पाकिस्तानकडून या दाव्याची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. परंतु, ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका-भारत-पाकिस्तान या त्रिकोणी संबंधांवर नवी चर्चा सुरू झाली आहे.
Ans: त्यांच्या म्हणण्यानुसार, भारत-पाकिस्तानमधील अणुयुद्ध थांबवण्यासाठी त्यांनी ही कडक धमकी वापरली.
Ans: हा दावा ट्रम्प यांनी केला असला तरी पाकिस्तानकडून यावर अधिकृत पुष्टी नाही.
Ans: एप्रिलमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केले आणि तणाव वाढला.