Epstein Files : ट्रम्पमुळे अखेर अमेरिकेची गुपिते जगासमोर उघड होणार; 'हे' गुप्त दस्तऐवज ३० दिवसांत सार्वजनिक करणार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Jeffrey Epstein Case : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Epstein Case) चौकशीशी संबंधित सर्व तपास फायली सार्वजनिक करण्यासाठी महत्त्वाच्या विधेयकावर सही केली आहे. अनेक दिवसांच्या राजकीय वाद-संवादानंतर काँग्रेसने हे विधेयक मंजूर केले होते आणि अखेर ट्रम्प यांनी उशिरा रात्री यावर स्वाक्षरी करत मोठा निर्णय घेतला. आता न्याय विभागाला (DOJ) ३० दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे शोधण्यायोग्य, डाउनलोड करण्यायोग्य आणि सर्वांसाठी खुले स्वरूपात जाहीर करावी लागणार आहेत.
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात हे विधेयक ४२७-१ अशा प्रचंड बहुमताने पारित झाले. त्यानंतर सिनेटमध्येही ते मंजूर झाले. मतदानापूर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कागदपत्रे रोखून धरण्याचे आरोप करत जोरदार टीका केली. स्पीकर माईक जॉन्सन यांनी ट्रम्पचा बचाव करत सांगितले की, “राष्ट्रपतींचा काहीही हस्तक्षेप नव्हता आणि त्यांच्याकडे लपवण्यासारखे काही नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PakExposed : ‘लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत…’; माजी PoK पंतप्रधानांच्या VIDEOने उघडल्या पाकिस्तानच्या कटकारस्थानाच्या खिडक्या
स्वाक्षरीनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TruthOut वर डेमोक्रॅट नेत्यांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “एपस्टाईन हा आयुष्यभर डेमोक्रॅट होता. त्याने डेमोक्रॅटिक नेत्यांना मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आणि त्यांचे अनेकांशी जवळचे संबंध होते.” ट्रम्प यांनी बिल क्लिंटन, लॅरी समर्स, रीड हॉफमन, स्टेसी प्लास्केट आदी डेमोक्रॅट नेत्यांची विशिष्ट उदाहरणांसह नावे घेतली आणि एपस्टाईनशी असलेले त्यांचे संबंध लवकरच जगासमोर येतील असा दावा केला.
JUST IN: Epstein files bill hits President Trump’s desk, forcing the DoJ to release full unredacted records on Epstein, Maxwell, and elite ties within 30 days. Trump vowed to sign immediately. pic.twitter.com/4683G2Lyt7 — E X X ➠A L E R T S (@ExxAlerts) November 19, 2025
credit : social media
ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या स्पष्ट आदेशामुळेच हाऊस स्पीकर आणि सिनेट लीडर यांनी हे विधेयक पुढे नेले.त्यांच्या म्हणण्यानुसार, न्याय विभागाने आधीच ५० हजारांहून अधिक पानांची माहिती काँग्रेसला दिली आहे. ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर टीका करत सांगितले की, “डेमोक्रॅट्सनी एकही फाइल उघड केली नाही.”
ट्रम्प म्हणाले की,
“डेमोक्रॅट्स एपस्टाईन प्रकरणाचा वापर करून आमच्या मोठ्या कामगिरीवर पडदा टाकू इच्छितात.”
त्यांनी सीमा सुरक्षेतील सुधारणा, कर कपात, महागाई रोखणे, DEI धोरणांचे पुनर्मूल्यांकन, आठ युद्धांचा शेवट, लष्कराची पुनर्बांधणी, इराणची आण्विक क्षमता रोखणे आणि अमेरिकेत अब्जावधींची गुंतवणूक यांसारख्या उपलब्धींचा उल्लेख केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Navy : ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही काय करत आहात’, रशियामुळे ब्रिटनची सुरक्षा यंत्रणा हाई अलर्टवर; Frigate,P-8 Poseidon तैनात
एपस्टाईन प्रकरणातील तपास फायली उघड झाल्यावर मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, पुढील ३० दिवस अमेरिकन राजकारणात अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
Ans: जेफ्री एपस्टाईन प्रकरणातील सर्व तपास दस्तऐवज.
Ans: ३० दिवसांच्या आत.
Ans: फायली उघडल्यास डेमोक्रॅट्स-रिपब्लिकन्सवरील आरोपांबाबत मोठी माहिती समोर येऊ शकते.






