Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Files : Donald Trump मुळे अखेर अमेरिकेची गुपिते जगासमोर उघड होणार; ‘हे’ गुप्त दस्तऐवज 30 दिवसांत सार्वजनिक करणार

Jeffrey Epstein Case : एपस्टाईनच्या फायली जाहीर करण्यासाठी ट्रम्प यांनी विधेयकावर स्वाक्षरी केली, डीओजेला 30 दिवसांच्या आत कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आदेश दिले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 20, 2025 | 11:59 AM
Trump signs order to release Epstein files orders to open all documents within 30 days

Trump signs order to release Epstein files orders to open all documents within 30 days

Follow Us
Close
Follow Us:
  1. डोनाल्ड ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टाईन प्रकरणातील सर्व तपास फायली जाहीर करण्याच्या विधेयकावर सही केली.
  2. न्याय विभागाला (DOJ) ३० दिवसांच्या आत सर्व दस्तऐवज शोधण्यायोग्य आणि डाउनलोड करण्यायोग्य स्वरूपात सार्वजनिक करण्याचे आदेश.
  3. डेमोक्रॅट्सवर तीव्र निशाणा साधत ट्रम्प म्हणाले “एपस्टाईनचे खरे संबंध डेमोक्रॅट्सशीच!”

Jeffrey Epstein Case : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Epstein Case) चौकशीशी संबंधित सर्व तपास फायली सार्वजनिक करण्यासाठी महत्त्वाच्या विधेयकावर सही केली आहे. अनेक दिवसांच्या राजकीय वाद-संवादानंतर काँग्रेसने हे विधेयक मंजूर केले होते आणि अखेर ट्रम्प यांनी उशिरा रात्री यावर स्वाक्षरी करत मोठा निर्णय घेतला. आता न्याय विभागाला (DOJ) ३० दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे शोधण्यायोग्य, डाउनलोड करण्यायोग्य आणि सर्वांसाठी खुले स्वरूपात जाहीर करावी लागणार आहेत.

काँग्रेसमध्ये ४२७-१ मतांनी विधेयक मंजूर

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात हे विधेयक ४२७-१ अशा प्रचंड बहुमताने पारित झाले. त्यानंतर सिनेटमध्येही ते मंजूर झाले. मतदानापूर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कागदपत्रे रोखून धरण्याचे आरोप करत जोरदार टीका केली. स्पीकर माईक जॉन्सन यांनी ट्रम्पचा बचाव करत सांगितले की, “राष्ट्रपतींचा काहीही हस्तक्षेप नव्हता आणि त्यांच्याकडे लपवण्यासारखे काही नाही.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PakExposed : ‘लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत…’; माजी PoK पंतप्रधानांच्या VIDEOने उघडल्या पाकिस्तानच्या कटकारस्थानाच्या खिडक्या

ट्रम्पचे डेमोक्रॅट्सवर आरोप : “एपस्टाईन त्यांच्या जाळ्यात खोलवर होता”

स्वाक्षरीनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TruthOut वर डेमोक्रॅट नेत्यांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “एपस्टाईन हा आयुष्यभर डेमोक्रॅट होता. त्याने डेमोक्रॅटिक नेत्यांना मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आणि त्यांचे अनेकांशी जवळचे संबंध होते.” ट्रम्प यांनी बिल क्लिंटन, लॅरी समर्स, रीड हॉफमन, स्टेसी प्लास्केट आदी डेमोक्रॅट नेत्यांची विशिष्ट उदाहरणांसह नावे घेतली आणि एपस्टाईनशी असलेले त्यांचे संबंध लवकरच जगासमोर येतील असा दावा केला.

JUST IN: Epstein files bill hits President Trump’s desk, forcing the DoJ to release full unredacted records on Epstein, Maxwell, and elite ties within 30 days. Trump vowed to sign immediately. pic.twitter.com/4683G2Lyt7 — E X X ➠A L E R T S (@ExxAlerts) November 19, 2025

credit : social media

ट्रम्पचे विधान : “मीच फायली उघडण्याचा मार्ग मोकळा केला”

ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या स्पष्ट आदेशामुळेच हाऊस स्पीकर आणि सिनेट लीडर यांनी हे विधेयक पुढे नेले.त्यांच्या म्हणण्यानुसार, न्याय विभागाने आधीच ५० हजारांहून अधिक पानांची माहिती काँग्रेसला दिली आहे. ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर टीका करत सांगितले की, “डेमोक्रॅट्सनी एकही फाइल उघड केली नाही.”

डेमोक्रॅट्सवर विचलित करण्याचा आरोप

ट्रम्प म्हणाले की,

“डेमोक्रॅट्स एपस्टाईन प्रकरणाचा वापर करून आमच्या मोठ्या कामगिरीवर पडदा टाकू इच्छितात.”

त्यांनी सीमा सुरक्षेतील सुधारणा, कर कपात, महागाई रोखणे, DEI धोरणांचे पुनर्मूल्यांकन, आठ युद्धांचा शेवट, लष्कराची पुनर्बांधणी, इराणची आण्विक क्षमता रोखणे आणि अमेरिकेत अब्जावधींची गुंतवणूक यांसारख्या उपलब्धींचा उल्लेख केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Navy : ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही काय करत आहात’, रशियामुळे ब्रिटनची सुरक्षा यंत्रणा हाई अलर्टवर; Frigate,P-8 Poseidon तैनात

अमेरिकी प्रशासनात नवीन राजकीय भूकंप

एपस्टाईन प्रकरणातील तपास फायली उघड झाल्यावर मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, पुढील ३० दिवस अमेरिकन राजकारणात अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी कोणत्या फायली जाहीर करण्याचे आदेश दिले?

    Ans: जेफ्री एपस्टाईन प्रकरणातील सर्व तपास दस्तऐवज.

  • Que: DOJ ला दस्तऐवज किती दिवसांत जाहीर करावे लागतील?

    Ans: ३० दिवसांच्या आत.

  • Que: हा निर्णय का महत्त्वाचा आहे?

    Ans: फायली उघडल्यास डेमोक्रॅट्स-रिपब्लिकन्सवरील आरोपांबाबत मोठी माहिती समोर येऊ शकते.

Web Title: Trump signs order to release epstein files orders to open all documents within 30 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • America
  • America news
  • Donald Trump
  • International Political news

संबंधित बातम्या

SindhIsland : पाकचा मोठा तेल जुगार; पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला देश ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट
1

SindhIsland : पाकचा मोठा तेल जुगार; पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला देश ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट

India Russia Partnership: डिसेंबरमध्ये पुतीन भारत दौऱ्यावर! स्वस्त तेलानंतर एलएनजी व जहाजबांधणीची मेगा ऑफर; अमेरिकेची वाढली चिंता
2

India Russia Partnership: डिसेंबरमध्ये पुतीन भारत दौऱ्यावर! स्वस्त तेलानंतर एलएनजी व जहाजबांधणीची मेगा ऑफर; अमेरिकेची वाढली चिंता

Terror Links : ‘ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद…’भारताविरुद्ध अतांकिस्तानचा धोकादायक कट; बांगलादेशी पंतप्रधान युनूसला बनवले ‘मोहरा’
3

Terror Links : ‘ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद…’भारताविरुद्ध अतांकिस्तानचा धोकादायक कट; बांगलादेशी पंतप्रधान युनूसला बनवले ‘मोहरा’

Trump-Mamdani च्या भेटीची तारीख ठरली निश्चित; राजकीय तणावानंतर पहिलीच प्रत्यक्ष चर्चा
4

Trump-Mamdani च्या भेटीची तारीख ठरली निश्चित; राजकीय तणावानंतर पहिलीच प्रत्यक्ष चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.