ट्रम्प विरोधात लेख लिहिणं पत्रकाराला भोवलं! कारवाईचा बडगा उगारत थेट दाखवला व्हाइट हाउसमधून दाखवला बाहेरचा रस्ता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त निर्णयांवरुन विधानांवरनु चर्चेचा विषय बनत असतात. त्यांच्या अनेक निर्णयांनी जगाला हादरवून टाकले आहे. दरम्यान पुन्हा एकदा ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका प्रकाशित लेखावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकाराला काढून टाकले आहे.
वॉल स्ट्रीट जनरलच्या या लेखात पत्रकाराने जेफ्री एपस्टाईन बद्दल एक वादग्रस्त लेख लिहीला आहे. यामुळे या प्रकरणावरुन वाद वाढत चालला आहे. या प्रकरणाशी संबंधीत ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प अगामी दौऱ्यासाठी सकॉटलंडला जाणार आहेत. यासाठी त्यांच्या पत्रकारांची एक अधिकृत टीम देखील जाणार आहे.
मात्र या टीममधील एका पत्रकाराला काढून टाकण्यात आले आहे. एअर फोर्स वन मध्ये समाविष्ट असलेल्या या पत्रकाराला काढूनच टाकण्यात आलेले नाही. तर त्यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल करण्यात आला आहे. १० अब्ज डॉलर्सचा मानहानीचा खटला पत्रकारावर दाखल झाला आहे.
२००३ मध्ये लैंगिक तस्कीरीच्या प्रकरणातील हाय प्रोफाईल जेफ्री एपस्टाईनच्या एका अल्बममध्ये ट्रम्प यांना उद्देशून एक पत्र लिहिण्यात आले होते. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. ट्रम्प यांनी या प्रकरणाशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले होते. यामुळे त्यांनी या लेखावर तीव्र संताप व्यक्त केला होता.
व्हाईट हाऊने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात स्कॉटलंडमधील टर्नबेरी आणि एबरडीन येथे राष्ट्रपतींच्या गोल्फ कोर्स भेटीचे या लेखात वृत्तांकन करण्यात आले होते. यामुळे वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका पत्रकाराला काढून टाकले असल्याचे व्हाइट हाऊसने सांगितले आहे.
व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, वॉ स्ट्रीट जर्नलच्या खोट्या आणि अपमानजनक माहितीमुळे पत्रकाराला काढून टाकण्यात आले आहेत. दरम्यान या कारवाईवर अद्याप नॉल स्ट्रीट जनरलनेही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गेल्या महिन्यांत टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीव्र वाद पेटला होता. ट्रम्प यांच्या बिग वन ब्युटीफुल धोरणावरुन हा वाद सुरु झाला होता. यादरम्यान दोघेही सोशल मीडियावर भांडत होते. यावेळी मस्क यांनी एपस्टाईन प्रकरणाशी ट्रम्प यांचा संबंध असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून ट्रम्प या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
अमेरिकेतील श्रीमंत उद्योक जेफ्री एपस्टिन याच्या हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय प्रकरणाशी संबंधित आहे. २०१९ मध्ये एपस्टिनवर व्हर्जिनिया ग्रिफे या महिलेने लैंगिक तस्करी आणि शोषणाचा आरोप केला होता. यामध्ये जेफ्रीला अटही करण्यात आली होती. परंतु जेफ्रीचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला. त्याने आतम्हत्या केली असल्याचे म्हटले जाते. दरवर्षी या प्रकरणाशी संबंधित माहितीचा खुलासा केला जाता. यामध्ये अनेक प्रभावशाली लोकांचा समावेश आहे.