Trump Tasks Elon Musk To Bring Home Stranded Sunita Williams
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांची मैत्री अलीकडे चर्चेचा विषय बनत आहे. ट्रम्प यांचा मस्कवरील वाढत्या विश्वासाचे अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. त्यांना ट्रम्प प्रशासनात सामील केले असून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सुनिता विल्यम्स यांना परत आणण्याची जबाबदारी सोपवली आहे. एलॉन मस्क यांनी सुद्धाही जबाबदारी स्वीकारली आहे.
मस्क लवकरच शूर अंतरावीरांना परत आणतील
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, “मी मस्कला दोन्ही शूर अंतराळवीरांना परत आणण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी जो बायडेन यांच्यावर ताणा कसत, बायडेन प्रशासनाने त्यांना अंतराळातच सोडले असे म्हटले आहे. आता मस्क लवकरच त्यांना परत आणण्यासाठी कार्य सुरु करतील. आशा आहे की, सर्वजण सुरक्षित असतील” असे म्हटले आहे. तर नासाने देखील काही महिन्यांपूर्वीच स्पेसएक्ससोबत मिळून अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
आठ दिवसांचा प्रवास दहा महिन्यात बदलला
सुनिता विल्यम्स गेल्या दहा महिन्यापासून अंतराळात अडकलेल्या आहेत. 5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंगच्या स्टारलाईनर कॅप्सूलच्या चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेले होते. त्यांना फक्त 8 दिवस तेथे राहायचे होते, परंतु त्यांच्या कॅप्सूलमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने त्यांचा प्रवास 10 महिन्यांपर्यंत लांबला आहे.
असे करणार स्पेसएक्स बचाव
आता एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेक्राफ्टच्या मदतीने दोन्ही अंतरावीरांना पर आणण्यात येणार आहे. नासाने डिसेंबर 2024 मध्ये या संबंधित माहिती जाहीर केली होती. सथ्या त्यासाठी लागणारे नवीन कॅप्सूल तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे ही मोहीम फेब्रुवारी ऐवजी मार्चच्या शेवटच्या आठवड्या होऊ शकते.
मात्र, त्यासाठी नवीन कॅप्सूल तयार करावा लागणार असल्याने मोहीम फेब्रुवारी 2025 ऐवजी मार्चच्या शेवटी मिशन पूर्ण होईल. मात्र, अधिक विलंब होण्याची शक्यता आहे. सुनीता विल्यम्स या अंतराळ स्थानकावर अजून काही महिने राहण्यास तयार आहेत, पण नासाला शक्य तितक्या लवकर त्यांना परत आणायचे आहे.
यामुळे अंतराळात अडकल्या सुनिता विल्यम्स
स्टारलाईनर कॅप्सूलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. लॉन्चच्या वेळी त्याच्या थ्रस्टरमध्ये हीलियम गॅस गळती झाली होती. या गळतीमुळे कॅप्सूलचे 5 थ्रस्टर बंद पडले आणि प्रॉपेलेंट वॉल्वही नीट बंद झाला नाही. नासाने आणि अंतराळ स्थानकावरील तज्ञांनी हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. यामुळे दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकात अडकले आहेत. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, इलॉन मस्क आणि स्पेसएक्स किती लवकर त्यांना सुखरूप परत आणतात.