_Trump warns Elon Musk refuses to improve relations
वॉशिंग्टन: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉनमस्क यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु होते. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांवर हल्ला चढवत होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल धोरणेवर मस्क यांनी टीका केली अन् ट्रम्प नाराज झाले. इथूनच दोघांच्यात घमासान शाब्दिक युद्ध सुरु झाले. दरम्यान शनिवारी मस्क यांनी ट्रम्प यांच्या एपस्टिन फाईल्सशी संबंध आहे, असा आरोप करणारी पोस्ट डीलिट करत नमतं घेतलं. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र मागे न हटण्याचा निर्धार केला आहे.
शनिवारी ट्रम्प यांनी स्पष्ट केले त्यांना आता एलॉन मस्कसोबत कोणतेही संबंध सुधारण्याची इच्छा नाही. तसेच त्यांनी असेही स्पष्ट शब्दांत सांगतिले की, मस्क यांनी आता गंभीर परिणामांना सोमोरे जाण्यासाठी तयार रहावे. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी मस्कने निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न करु नये असाही इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. एनबीसीच्या क्रिस्टन वेल्कर यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी मस्क यांच्याशी त्यांना संबंध सुधारण्याची इच्छा नसल्याचे म्हटले. तसेच त्यांनी मस्क यांनी २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीदरम्यान डेमोक्रॅटिक कायदेकर्ते आणि उमेदवारांना मदत न करण्याचा इशारा दिला. नाहीतर मस्क यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, टेस्ला आणि स्पेसएक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी असलेले सर्व संबंध आता संपले आहेत असेही त्यांनी म्हटले.
ट्रम्प म्हणाले की, मी इतर कामात खूप व्यस्त आहे. सर्वांना माहित आहे मी निवडणूक मोठ्या फरकाने जिंकलो. मी मस्कला खूप संधी दिल्या, हे सर्व सुरु होण्याआधी मी त्यांना माझ्या प्रशासनात काम करण्याची संधी दिली. माझ्या पहिल्या प्रशासनात मी त्याचा जीव वाचवला. पण यावेळी माझा मस्कशी संबंध सुधारण्याचा कोणताही हेतू नाही.
एलॉन मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल विधेयकावर टीका केली होती. यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरु झाले. मस्क यांनी ट्रम्प यांच्या विधेयकावर टीका केली आणि संघीय तूट वाढेल अशी चिंता व्यक्त केली. त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून राजीनामा दिला.
यानंतर ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर निशाणा साधला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्कला अजूनही व्हाईट हाऊसची आठवण येते असे म्हटले. यावर प्रत्युत्तरार्थ मस्क यांनी ट्रम्प त्यांच्या पाठिंब्याशिवाय निवडणुक जिंकले नसते असे म्हटले. यानंतर ट्रम्प यांनी मस्क यांच्या टेस्ला सारख्या कंपनींशी असलेले सर्व सरकारी कार्य रद्द करण्याची धमकी दिली. तर मस्क यांनी ट्रम्प यांचा वेश्याव्यसायाशी संबंध असलेल्या जेफ्री एपस्टिन फाईलमध्ये ट्रम्प यांचेही नाव असल्याचा गंभीर आरोप केला. सध्या मस्क यांनी ही पोस्ट दिली असून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.