Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Warns Netanyahu : ‘मनमानी चालणार नाही ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इराणशी युद्धावरुन सज्जड दम, साथ देण्यास दिला नकार

Trump Warns Netanyahu : इराणशी युद्धावरुन ट्रम्प यांनी इस्रायलला सुनावले आहे. त्यांनी नेतन्याहूंना स्पष्ट इशारा दिला आहे की, इराणविरोधात युद्ध सुरु केल्यास इस्रायलला एकटेच लढावे लागेल. अमेरिका कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नाही. यामुळे इस्रायललने आपण काय करतोय याचे भान ठेवावे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2026 | 02:09 PM
Trump Warns Netanyahu

Trump Warns Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इराणशी युद्धावरुन सज्जड दम
  • साथ देण्यास दिला नकार
  • आता काय करणार नेतन्याहू?
Trump Warns Netanyahu : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या प्रचंड तणाव वाढला आहे. इराणशी युद्धावरुन ट्रम्प यांनी नेतन्याहूंना स्पष्ट शब्दांत इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. इराणविरोधात एकट्या इस्रायललाचा युद्ध लढावे लागले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Trump Slams Iran : ‘आता पुरे झाले, हे थांबवा…’ , इराणच्या हल्ल्यानंतर भडकले ट्रम्प; नेतन्याहूंनाही केला फोन

रविवारी (०७ जून) इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तीव्र संघर्ष सुरु झाला होता. इस्रायलनेही पलटवार करत सोमवारी (०८ जून) इराणवर क्षेपणास्त्रे डागली होती. तसेच लेबनॉनवरही हल्ले सुरुच होते. यामुळे युद्धविराम धोक्यात आला होता. परिस्थिती अधिक गंभीर होत चालली होती. यामुळे ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांना देखील धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावरुन ट्रम्प यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते.

ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा

ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील संघर्ष थांबवण्याची इच्छा व्यक्त केली असून इस्रायलकडून कोणत्याही प्रकारची मनमानी झाल्यास त्यांना एकट्यानेच युद्ध लढावे लागेल. अमेरिका (America) कोणत्याही प्रकारे पाठिंबा देणार नाही. यामुळे इस्रायललने आपण काय करतोय याचे भान ठेवावे, अशा कडक शब्दांत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांना सुनावले आहे.

हल्ल्यानंतरही ट्रम्प यांचा नेतन्याहूंना फोन

ट्रम्प यांनी इस्रायलवर इराणच्या हल्ल्यानंतप नेतन्याहूंना कॉल केला होता. इस्रायलने तातडीने कोणतीही कारवाई करु नये असे म्हटले होते. परंतु नेतन्याहूंना याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह चार शहरांमध्ये भीषण हल्ले केले. या हल्ल्यात १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून महशर येथील एका पेट्रोकेमिकल प्रकल्पावरही हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, इराणने वाढत्या संघर्षानंतर आक्रमकता कमी केली आहे. इराणच्या लष्कराने आक्रमक कारवाया तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे नेतन्याहून यांनी हल्ले थांबवण्याचे संकेत दिले आहेत पण पुन्हा हल्ला झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.

सध्या दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला असून शांतता चर्चेला प्राधान्य दिले जात आहे. लेबॉननचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी चर्चेसाठी एका टेबलावर येण्याचे हिजबुल्लाह आणि इस्रायलला आवाहन केले आहे. परंतु अद्याप दोन्ही गटांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

H-1B Visa Update : भारतीयांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाने रद्द केली महागडी व्हिसा फी, ट्रम्प सरकारला झटका

Web Title: Trump warns netanyahu over iran war refuses us support amid middle east tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

Donald Trump: मी गेल्यानंतर तुमचे काय होईल? ट्रम्प यांनी घातली ‘2028’ ची टोपी, व्हाईट हाऊस पत्रकार परिषदेत पत्रकारांवर बोचरी टीका
1

Donald Trump: मी गेल्यानंतर तुमचे काय होईल? ट्रम्प यांनी घातली ‘2028’ ची टोपी, व्हाईट हाऊस पत्रकार परिषदेत पत्रकारांवर बोचरी टीका

H1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा दणका; 1 लाख डॉलर्सचे व्हिसा शुल्क रद्द, भारतीयांना मोठा दिलासा
2

H1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा दणका; 1 लाख डॉलर्सचे व्हिसा शुल्क रद्द, भारतीयांना मोठा दिलासा

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?
3

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?

US-Iran War: अमेरिकेचे सर्वात घातक B-1 Lancer बॉम्बर मैदानात; इराणच्या IRGC तळांवर भीषण हल्ला, तेहरान उडवून देण्याचा इशारा
4

US-Iran War: अमेरिकेचे सर्वात घातक B-1 Lancer बॉम्बर मैदानात; इराणच्या IRGC तळांवर भीषण हल्ला, तेहरान उडवून देण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.