
Trump's advisors Peter Navarro criticize India Make serious allegations over Russian oil purchase
Peter Navarro on India : वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर ५०% टॅरिफ लागू केले आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. अशातच पुन्हा एकदा अमेरिकेने (America) भारतवार टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे वरिष्ठ व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर टीका केली आहे.
पीटर नवारो यांनी भारताला टॅरिफचा महाराजा म्हटले आहे. त्यांच्या मते, भारत हा जगातील सर्वाधिक शुल्क (Tarrif) लादणार देश आहे. विशेष करुन भारताने अमेरिकेवर जास्त कर लादला आहे. यामुळे अमेरिकेन उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळत नाही, असा दावा पीटर नवारो यांनी केला आहे. त्यांनी भारताच्या व्यापार धोरणांवर तीव्र टीका केली आहे.
तसेच पीटर नवारो यांनी अमेरिकेच्या व्यापार तुटीबद्दल मोठा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका भारताकडून उत्पादने आयात करते आणि या बदल्यात त्यांना डॉलर पाठवते. या डॉलर्सने भारत रशियन तेल खरेदी करतो. भारत असे करुन रशियाला युक्रेनवर युद्ध करण्यासाठी अमेरिकन डॉलर्सचा वापर करत आहे. यामुळे रसियाला अमेरिकेच्या पैशातून पाठिंबा मिळत आहे आणि युक्रेनचे नुकसान होत आहे.
नवारो यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही, यामुळे हा कर लागू करण्यात आला असल्याचे म्हटले. तसेच अमेरिकेचे आर्थिक निर्णय हे देशाच्या सुरक्षेसाठी घेण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२७ ऑगस्टपासून भारतावर ५०% आयात कर
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% आयात शुल्क लागू केले आहे. २७ ऑगस्टपासून हा कर आकाराला जाणार आहे. ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल गंभीर आरोपही केले आहेत. भारत रशियाला अप्रत्यक्षपणे युक्रेनविरुद्ध युद्धात मदत करत असल्याचे म्हटले आहे. भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला आणि आरोपांना तीव्र विरोध केला आहे. अमेरिकेचे टॅरिफ अन्यायकारक आणि निराधार असल्याचे भारताने म्हटले आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ का लादले आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते भारता हा सर्वाधिक टॅरिफ लादणार देश आहे, विशेष करुन अमेरिकेवर भारताने जास्त टॅरिफ लादले आहे. तसेच भारत रशियाकडून तेल खरेदी करुन युक्रेनविरुद्धच्या युद्धात त्यांना इंधन पुरवत आहे.
ट्रम्प यांनी सुरुवातील भारतावर किती टॅरिफ लादले होते?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या सुरुवातील भारतावर २६% कर लागू केला होता, त्यानंतर हा कर २५% करण्यात आला. परंतु आता भारताने रशियाकडून तेल खरेदी केली नसल्यामुळे हा कर ५०% करण्यात आला आहे.