'डर्टी इंडियन, गो बैक टू इंडिया! सहा वर्षांच्या भारतीय चिमुरडीसोबत 'या' देशात घडला धक्कादायक प्रकार, उसळली संतापाची लाट (फोटो सौजन्य: iStock)
Ireland news : डब्लिन : आयर्लंडमध्ये भारतीय वर्षाच्या चिमुकलीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सहा वर्षांच्या चिमुकली वांशिक हल्ल्याची शिकार बनली आहे. सध्या या घटनेने सर्व खळबळ उडाली आहे. काही मुलांनी या चिमुकलीवर हल्ला केला असून तिला भारतात परत जाण्यास सांगितले आहे. मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत असताना १२ ते १४ वर्षाच्या मुलांच्या गटाने तिच्यावर हल्ला केल्याचे पीडीतेच्या आईने सांगितले.
मीडिया रिपोर्टनुसार, आग्नेय आयर्लंडमधील वॉटरफोर्ड शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडीतेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिची मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी ती तिच्या १० महिन्याच्या चिमुकल्या मुलाला खाऊ घालण्यासाठी घरात गेली. यावेळी चिमुकली घराबाहेरच खेळत होती. त्यानंतर काही मिनटांनी तिची मुलगी रडत रडत घरात आली. संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्रीच का फोडला टॅरिफ बॉम्ब? अमेरिकेला होणार अब्जावधी डॉलर्सचा फायदा?
पीडीतेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, काही १२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या गटाने तिच्या मुलीवर हल्ला केला. मुलांनी तिच्या मुलीच्या तोंडवर बुक्की मारली, तिला खाली पाडले, तिचे केस ओढले. तसेच तिच्या गुप्तांगावरही मारले. आईने सांगितले की, मुलांनी चिमुकलीच्या अंगावरुन सायकलही चालवली. यावेळी चिमुकलीचे वडिल कामावर गेले होते. शिवाय त्या मुलांनी चिमुकलीला अपशब्द ही बोलले. तिला ‘डर्टी इंडियन, गो बॅक टू इंडिया’ (‘Dirty Indian, Go Back To India’) असेही म्हटले. त्या चिमुकलीला बोलताही येत नव्हते. चिमुकली प्रचंड घाबरली होती, असे तिच्या आईने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडीतिचे कुटुंब गेल्या आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहत आहे. नुकतेच त्यांना आयर्लंडचे नागरिकत्वही मिळाले होते. पीडितेची आई आयर्लंडमध्ये नसर्चे काम करते. तिने मुलांविरोधता तक्रार दाखल केली आहे, परंतु त्यांना शिक्षा न देता त्यांचे काउन्सलिंग व्हावे अशी इच्छा पीडितेच्या आईने व्यक्त केली आहे.
यापूर्वी देखील आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या लोकांसोबत अशा घटना घडल्या आहे. भारतीयांवर वाशिंक वादातून हल्ला करण्यात आला आहे. गेल्या महिन्यांत ४० वर्षाच्या पुरुषावर वांशिक वादातून हल्ला करण्यात आला होता. त्याला बेदम मारहाम करुण त्याचे कपडे फाडण्यात आले होते. आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्ये ही घटना घडली होती. आयर्लंडमध्ये अशा घटनांचे प्रमाण वाढले असून विशेष करुन आयर्लंडच्या टॅलाघ्ट आणि क्लोडांल्किनमध्ये या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
घानामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण, पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू