Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणमध्ये सत्तापालटाची ट्रम्प यांची योजना? अमेरिकेचा ‘सीक्रेट प्लॅन’ उघडकीस, मध्यपूर्वेत खळबळ

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्यानंतर ट्रम्प विजयामुळे पश्चिम आशियातील राजकीय स्थिरतेवर मोठा परिणाम झाला आहे. इराणमध्ये सत्तापालटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 17, 2024 | 07:20 PM
इराणमध्ये सत्तापालटाची ट्रम्प यांची योजना? अमेरिकेचा 'सीक्रेट प्लॅन' उघडकीस, मध्यपूर्वेत खळबळ

इराणमध्ये सत्तापालटाची ट्रम्प यांची योजना? अमेरिकेचा 'सीक्रेट प्लॅन' उघडकीस, मध्यपूर्वेत खळबळ

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प प्रशासनात अनेक पदांच्या नियुक्त्या केल्या. ट्रम्प यांच्या विजयानंतर संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. यामुळे पश्चिम आशियातील राजकीय स्थिरतेवर मोठा परिणाम झाला आहे. ट्रम्प यांच्या सभाव्य धोरणांमुळे इराणमध्ये सत्तापालटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.संपूर्ण मध्येपूर्वेत दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.

एकीकडे इस्त्रायल हमास हिजबुल्लाह आणि इराणवर कारवाई केली जात असून एक वृत्तपत्राने खुलासा केला आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या शासनाला पाडण्याचा कट ट्रम्प यांनी रचला आहे. या अहवालानुसार, इराणचे अध्यक्ष मसूद पेजशाकियान हे खामेनेई यांची जागा घेतील असे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांचे ध्येय इराणची ताकद कमी करून इस्रायलमध्ये शांतता प्रस्थापित करणे असल्याचा म्हटले जात आहे.

आर्थिक निर्बंध आणि राजकीय नियुक्त्या

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या आधीच्या काळामध्ये इराणसोबतचा अणुकरार संपुष्टात आणला होता. यासाठी त्यांनी अनेक कठोर निर्बंध लादले. आता, नव्या कार्यकाळातही त्यांनी इराणविरोधी धोरण अधिक आक्रमक बनवण्याची तयारी केली असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात इराणविरोधी लोकांना प्रमुख पदांवर नेमले आहे. माईक वॉल्ट्ज यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून, माईक हुकाबी यांना इस्रायलमधील राजदूत म्हणून, तर पीट हेगसेथ यांना संरक्षण सचिव म्हणून नियुक्त केले आहे. हेगसेथ यांनी इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ल्याची शिफारस केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायलच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू; गाझात गेल्या वर्षभरात अनेकांना गमवावा लागला जीव

इराणने ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला होता

इराणने ट्रम्प यांना कट्टर शत्रू मानले आहे. ट्रम्प यांच्या निवडणुक प्रचारादरम्यान, इराणने त्यांची हत्या करण्याचा कट रचल्याचे आरोप झाले होते. सप्टेंबरमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने एका भाडोत्री मारेकऱ्याला ट्रम्प यांना ठार मारण्याचे आदेश दिले होते इफ्राद शकेरी नावाच्या व्यक्तीवर ट्रम्प यांच्या हत्येची जबाबदारी सोपवण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर, इराणसाठी ट्रम्प यांचे अध्यक्षपद अधिक संकटे निर्माण करू शकते.

मात्र इराणने हे आरोप फेटाळून लावले होते. इराणचे प्रमुख खामेनेई यांनी म्हटले होते की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कोणताही हेतू इराणचा नाही. याउलट इराण अमेरिकेसोबत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात हा संदेश इराणने अमेरिकेला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

इराणवर ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाचा काय परिणाम होईल

ट्रम्प यांच्या प्रशासनाचा इराणवर तेल निर्यातीसह कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचा विचार आहे. त्यामुळे इराणमध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच, पश्चिम आशियातील राजकीय तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेच्या या धोरणामुळे इराणमध्ये सत्ता बदलाच्या हालचालींना चालना मिळू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इराणचा अमेरिकेला संदेश; सांगितली ट्रम्प यांच्या हत्येची योजना, नेमके प्रकरण काय?

Web Title: Trumps plan for a coup in iran americas secret plan revealed nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • iran
  • Israel

संबंधित बातम्या

ATP Finals : अखेर स्वप्न साकार! अल्काराजने जिंकली एटीपी फायनल्सची ट्रॉफी; म्हणाला, यासाठीच केला होता अट्टाहास
1

ATP Finals : अखेर स्वप्न साकार! अल्काराजने जिंकली एटीपी फायनल्सची ट्रॉफी; म्हणाला, यासाठीच केला होता अट्टाहास

US Tech Outages : सिस्टीम अपग्रेडमुळे अमेरिकेत पुन्हा अत्यावश्यक सेवा विस्कळीत होणार; गुप्तचर प्रमुखांचे सायबर हल्ल्यांवर मौन
2

US Tech Outages : सिस्टीम अपग्रेडमुळे अमेरिकेत पुन्हा अत्यावश्यक सेवा विस्कळीत होणार; गुप्तचर प्रमुखांचे सायबर हल्ल्यांवर मौन

Nvidia : आणि ‘ते’ काम स्पाय ॲलिस हुआंगने केले? अमेरिका-चीन टेक्नॉलॉजी वॉरला नवे वळण; चिनी गुप्तचर संस्थेची गुप्त मोहीम
3

Nvidia : आणि ‘ते’ काम स्पाय ॲलिस हुआंगने केले? अमेरिका-चीन टेक्नॉलॉजी वॉरला नवे वळण; चिनी गुप्तचर संस्थेची गुप्त मोहीम

Oman Egg Import Ban : ओमानची अंडींवर आयातबंदी; तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये 6 कोटी अंडी अडकली, पोल्ट्री उद्योजक संकटात
4

Oman Egg Import Ban : ओमानची अंडींवर आयातबंदी; तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये 6 कोटी अंडी अडकली, पोल्ट्री उद्योजक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.