फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: 2024च्या निवडणुकी प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यादरम्यान ट्रम्प यांना एक गोळी त्यांच्या कानाला लागून गेली. त्यांनी कोणतीही गंभीर दुखीपत झालेली नव्हती. त्यानंतर हा हल्ला कोणी केला याबाबत तपास सुरू होता. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या न्याय विभागाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या कटाशी संबंधित गंभीर गुन्हेगारी आरोपांचा उलगडा केला. न्याय विभागाच्या अहवालानुसार, इराणच्या अर्धसैनिक रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) च्या एका अधिकाऱ्याने ट्रम्प यांच्या हत्या करण्यासाठी कट रचला होता.
ट्रम्प यांच्या हत्येचा कोणताही हेतू नाही
फरहाद शकेरी नावाच्या इराणच्या सरकारी कर्मचाऱ्याला ट्रम्प यांची हत्या करण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, आता इराणने हे आरोप फेटाळून लावले आहेत. इराणने याबाबत एक संदेश अमेरिकेला पाठवला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने या संदेशात म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कोणताही हेतू इराणचा नाही. याउलट इराण अमेरिकेसोबत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात हा संदेश इराणने अमेरिकेला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा आरोप इराण-अमेरिका युद्ध मानले जाईल
इराणने अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाला संदेश पाठवला होता की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कोणताही आरोप इराण-अमेरिका युद्ध मानले जाईल. बायडेन प्रसासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणनला 2020 मध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्याचा बदला घ्यायचा आहे. या हल्ल्यामध्ये इराणचे लष्करी कमांडर जनरल कासिम सलेमानी यांना सीरियामध्ये ठार करण्यात आले होते. तेव्हापासून इराणला ट्रम्प यांची हत्या करून याचा बदला घ्यायचा आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार न्याय मिळवण्याची योजना
याशिवाय इराणने म्हटले आहे की, जनरल सुलेमानी यांची हत्या एक गुन्हेगारी कृत्य होते, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करून आम्हाला बदला घ्यायचा नाही. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार, इराणने डोनाल्ड ट्रम्प आणि ट्रम्प प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र, इराणने संदेशाद्वारे हे दावे फेटाळले आहेत. इराणने सांगितले की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार न्याय मिळवण्याची त्यांची योजना आहे, परंतु कोणत्याही हिंसक कृत्याचा विचार नाही.
आयातुल्ला खामेनेई यांनी देखील पत्र लिहिले
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनीही या संदर्भात पत्र लिहिले असल्याचा उल्लेख अमेरिकन प्रसारमाध्यमांनी केला आहे. या पत्रात जनरल सुलेमानी यांच्या हत्येचे वर्णन गुन्हेगारी कृत्य म्हणून करण्यात आले आहे. तसेच, अमेरिकेने इराणवर आरोप केला आहे की, पाकिस्तानी नागरिकाच्या माध्यमातून अमेरिकन नेत्यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. अमेरिकेने यासंदर्भात एका व्यक्तीला अटकही केली होती.
इलॉन मस्क यांची इराणच्या राजदूताशी भेट
दरम्यान, इलॉन मस्क आणि इराणचे अमेरिकेतील राजदूत अमीर सईद इरावानी यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीची माहिती देखील समोर आली आहे. या भेटीत ट्रम्प कॅम्पलाही थेट संघर्ष टाळायचा आहे, याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे म्हटले जात आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.