Trump's tariff actions disappoint the world
नवी दिल्ली : तानाजी म्हणाला, नेताजी अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी म्हणजे ट्रम्प यांनी कि टॅरिफ संदर्भात भारतासोबतची आमची वागणूक रेसिप्रोकल असेल. रेसिप्रोकल काय आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. ट्रम्पच्या धमकीबाबत आपणाला काय वाटते? नेताजी म्हणाले आम्ही आमची धमक कायम ठेवली पाहिजे. कुणाच्या धमक्यांना भीक घालायची गरज नाही. ट्रम्प म्हणजे सायकलीत हवा भरण्याचा पंप हे तुला मी मागेच सांगितले. आज काल मिळेल त्या देशाला फुटबॉल समजून ते हवा भरत आहेत.
भारत म्हणजे युक्रेन किंवा इराण नाही. जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश भारत आहे. आम्ही १४० कोटी आहोत. एकसाथ शिंकलो तर ट्रम्प उडून जातील. आमची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एकवटून आहे. बांगलादेश युद्धात तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी बंगालच्या खाडीत सातवा बेडा पाठविण्याची धमकी दिली होती. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या पाठवा. पाठवा आमचा विक्रांत त्याला निपटून टाकेल. तेंव्हाच अमेरिका समजला कि भारत धमक्यांना घाबरणारा देश नाही. तानाजी म्हणाला, नेताजी ट्रम्प यांना धमक्या देण्याची विकृती आहे. ते पेशाने बिल्डर आहेत. कुणाच्या जागा हडपून त्यावर आपले इमले बांधणे हा त्यांचा शौक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! 27 देशांना सतर्कतेचा इशारा, 45 कोटी लोकांचा जीव धोक्यात
आजकाल काही भूमाफिया. स्वतःला बिल्डर समजतात. ट्रम्प यातलेच एक वाटतात. कॅनडा व ग्रीनलँडवर त्यांचा डोळा आहे. त्यांची जमीन हडपण्याचे धोरण त्यांनी आखले आहे. ते डिप्लोमसीच्या पलीकडचे आहेत. सभ्य भाषा त्यांना बोलता येणार नाही आणि ते समजणार पण नाहीत. कोरोना काळात त्यांनी भारताला रेमेडिसिवीर औषधी पाठवा अन्यथा. अशी भाषा वापरली होती. अन्यथा म्हणजे क्या करेगा रे तू असे आम्ही म्हणू शकलो असतो. पण आम्ही सभ्य आहोत. ट्रम्प यांच्या भाषेत आम्ही बोलणार नाही. कोरोनात भारत जगाची फार्मसी झाले होते. आम्ही खूप देशांना लस व औषधी पुरविल्या होत्या. नेताजी म्हणाले ट्रम्प गल्लीछाप दादा सारखे वाटतात.. मोदींनी त्यांना भलताच भाव दिला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल सर्वात धोकादायक, डोळ्यांनी पाहणे कठीण; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण
नमस्ते ट्रम्पचे आयोजन करून त्यांना सन्मान दिला आणि आज ते भस्मासुर बनू पाहताहेत. मोदींना व्हाईट हाऊसचे निमंत्रण दिले आणि त्यांना दरवाजापर्यंत ते घ्यायला आले नाहीत. एक ज्युनियर अधिकारी मोदींना घ्यायला पाठविले. मोदींसोबत चर्चा करतांना त्यांनी अमेरिकेत हातकड्या घालून भारतीयांना मायदेशी पाठविले. अमेरिकेने भारताला निवडणुकीत मोठी रक्कम दिली होती हे सुद्धा त्यांनी जगाला ओरडून सांगत भारताची नाचक्की करण्याचे काम त्यांनी केले. भाजपाने आपल्या भरवशावर निवडणूक जिंकली असे त्यांना म्हणायचे होते. ट्रम्प घमेंडी व अहंकारी आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी काय करावे लागेल ?