'या' देशाने बनवलेल्या ड्रोनने रचला इतिहास; हेरगिरी आणि हल्ला करण्यास आहे सक्षम
अंकारा: तुर्की हा देश जगातील ड्रोन महासत्ता असलेला देश आहे. तुर्कीने पुन्हा एकदा आपले प्रगत तंत्रज्ञान दाखवून जगभरात धाडसी पाऊल टाकले आहे. तुर्कीच्या Bayraktar TB-3 या अत्याधुनिक ड्रोनने नौदलाच्या युद्धनौका अनादोलूवर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा तुर्की हा जगातील पहिला देश बनला आहे. या देशामुळे अमेरिका, चीन, इस्त्रायल यांसारख्या देशांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मागे टाकले आहे.
Bayraktar TB-3 ड्रोन टेहळणी हेरगिरी, हल्ल्यासाठी सक्षम
तुर्कीचे हे Bayraktar TB-3 ड्रोन लढाऊ आहे. याशिवाय हे ड्रोन टेहळणीसाठी उत्तम मानवरहित अत्याधुनिक शस्त्र असल्याचे म्हटले जात आहे. हे ड्रोन टेहळणी, हेरगिरी, तसेच अचूक हल्ल्यासाठी सक्षम आहे. हे लहान ड्रोन क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या TB-3 ड्रोनची रेंज 1600 किमी असून ते सलग 24 तास उड्डाण करू शकते. या ड्रोनची विशेष म्हणजे यामध्ये इन्फ्रारेड कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. यामुळे हे ड्रोन उच्च क्षमतेने पाळत ठेवण्यास सक्षम आहे. याशिवाय हे ड्रोन, समुद्रसपाटीपासून ते समुद्राखालपर्यंत पाळत ठेवण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. या ड्रोनची निर्मिती Bayraktar कंपनीने केली आहे.
Bayraktar TB-3 Drone (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
TB-3 ड्रोन तुर्की युद्धनौकेच्या हवाई विभागाचा अविभाज्य भाग
यापूर्वीही बायरक्तर कंपनीने TB-2 ड्रोनसारख्या यशस्वी प्रकल्पांद्वारे तुर्कीला लष्करी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी मारली होती. आता हे TB-3 ड्रोन तुर्की युद्धनौकेच्या हवाई विभागाचा अविभाज्य भाग बनणार आहे. TB-3 हा TB-2 च्या तुलनेत अधिक प्रगत मानला जातो. हा नौदल आवृत्तीचा ड्रोन असून, त्याला विशेषतः युद्धनौकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. TB-3 ड्रोनने प्रथमच 2023 साली उड्डाण केले होते आणि त्यानंतर अनेक चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.
या ड्रोनच्या सहाय्याने तुर्की लष्कर आपल्या युद्धनौकांना “ड्रोन कॅरियर”मध्ये रूपांतरित करत आहे. यामुळे नौदलाच्या सामर्थ्यात प्रचंड वाढ होणार आहे. मात्र, अद्याप याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.तुर्कीच्या या ऐतिहासिक यशामुळे जगभरातील शक्तीशाली देशांची नजर आता तुर्कीच्या ड्रोन तंत्रज्ञानावर आहे. Bayraktar TB-3 केवळ तंत्रज्ञानाचा नव्हे, तर तुर्कीच्या वाढत्या सामरिक क्षमतेचाही अभिमान आहे. यामुळे तुर्कीने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचे स्थान अधिक भक्कम केले आहे.